जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी लोकसहभाग वाढवा - शैलेश हिंगे
‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियान · ग्रामस्तरीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा · बीजेएसच्या १३ पोकलॅन मशीन जिल्ह्यात दाखल वाशिम , दि . २९ : राज्य शासन व भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएस यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे सुरु आहेत. जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी या अभियानात लोकसहभाग वाढवून जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक असून याकरिता लोकप्रतिनिधी व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. नियोजन भवन सभागृहात आयोजित ग्रामस्तरीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. सोळंकी, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हाध...