प्रत्येक पदवीधर मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
· ओळखपत्र म्हणून १४ दस्ताऐवज ग्राह्य धरणार · मतदान वैध ठरण्यासाठी पहिला पसंतीक्रम देणे आवश्यक वाशिम , दि . ३० : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पदवीधर मतदाराने यावेळी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, मतदान नोंदविण्यासाठी मतदान केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांकडून जांभळ्या शाईचा स्केचपेन पुरविण्यात येईल. त्या पेनने आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावाच्या पुढे ‘१’ हा अंक भारतीय, रोमन कि...