Posts

वाशिम शहरात केली कायदेविषयक जनजागृती

Image
वाशिम शहरात केली कायदेविषयक जनजागृती वाशिम,दि.१६ (जिमाका) जिल्हा विधि सेवा प्राधिकरण वाशिमच्या वतीने नुकतीच राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून  विधि स्वयंसेवक शाहीर उत्तम इंगोले,माधव डोंगरदिवे, राजकुमार पडघान यांनी भीमनगर, खामगाव जिन तसेच शहरातील इतर भागांमध्ये कायदेविषयक माहिती असलेले पत्रके वाटली तसेच लोकांमध्ये कायदेविषयक प्रबोधन केले.         १४ नोव्हेंबर रोजी बालक दिनाचे अनुषंगाने पाटणी चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, संतोषीमाता नगर,माहूर वेश,रविवार बाजार या ठिकाणी कायदेविषयक माहिती असलेली पत्रके वाटून कायदेविषयक जनजागृती केली.       शाहीर उत्तम इंगोले यांनी पोवाडे तसेच लोक गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.यावेळी कायदेविषयक माहिती असलेल्या पत्रकांचे वाटप करून कायदेविषयक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आला.

तोंडगांव येथे जनजागृती कार्यक्रमातून दिली कायदेविषयक माहिती*

Image
*तोंडगांव येथे जनजागृती कार्यक्रमातून दिली कायदेविषयक माहिती*  वाशिम,दि.10 (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्री विधी सेवा दिनाच्या अनुषंगाने वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते. यावेळी तोंडगांवचे उपसरपंच गजानन गोटे, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. परमेश्वर शेळके, सहाय्यक लोक अभिरक्षक ॲड. शुभांगी खडसे, जिल्हा विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. वैभव तिफणे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. मोहन देशमुख, ॲड. जी. व्ही. मोरे व ॲड. सतिष सुर्वे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.               यावेळी श्री. टेकवाणी यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती देवून 9 डिसेंबर रोजी जिल्हयात सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून या लोक अदालतीचे जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे मध्यस्थीने मिटवावी. लोक अदालतीतील प्रकरणे मिटल्यामुळे दोन्ही पक्षाचा वि...

कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम*

Image
*20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर* *कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम* वाशिम,दि.10 (जिमाका)  समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा लवकरात लवकर शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान जिल्हयात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.         या शोध मोहिमेच्या अनुषंगाने आज 10 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. याच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात सभा घेण्यात आली.या सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, प्रभारी कुष्ठरोगचे सहायक संचालक डॉ. परभणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.         श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाने शाळेतील विद्यार्थ्यांची देखील तपासणी करावी. विद्यार्थ्यांना कुष्ठरोग आणि क्षयरोग या याबाबतची माहिती देवून त्यांच्यामध्ये जागृती करावी. विद्यार्थ्यांमध्ये जर संशयीत रुग्ण आढळून आल्यास त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात काळजीपूर्वक तपासणी करावी. कुष्ठरुग्ण आणि सक्र...

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना**8 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले*

Image
*पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना* *8 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले* वाशिम,दि.10 (जिमाका) ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी  बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत,त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.           विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/ शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रीया अधिक पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चारवर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू आहे.          सन 2021-22 या वर्षापासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.यामध्ये एखाद्या योजनेकरीता लाभार्थ्याने अर्ज क...

अखेर खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीअंतर्गत पिक विमा मंजूर**2 लक्ष 70 हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ*

Image
*अखेर खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीअंतर्गत पिक विमा मंजूर* *2 लक्ष 70 हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ* वाशिम,दि.10 (जिमाका) प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2023-24 च्या अंमलबजावणीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक वाशिम जिल्हयासाठी करण्यात आली आहे.पावसातील खंड व दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर हंगामातील प्रतिकुल परिस्थीती या बाबीअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के अगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.  त्याअनुषंगाने माहे, ऑगस्ट 2023 या महिन्यातील 3 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्हयातील 46 महसुल मंडळामध्ये वरील कालावधीत सरासरी पावसाच्या 50 टक्केपेक्षा कमी पाऊस पडला. 31 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय समितीची या अनुषंगाने बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीमध्ये जिल्हयातील 46 महसूल मंडळाकरीता हंगामातील प्रतिकुल परिस्थीती या बाबीअंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याबाबत विमा कंपनीस सूचन...