Posts

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ वाशिम , दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्कर बजावितांना मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास सोबत आणावयाच्या ११ पर्यायी दस्तऐवजांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट , वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) , छायाचित्र असलेले कमर्चारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन , सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र) , छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक , पॅन कार्ड , एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड , मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड , भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड , छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्रे , खासदार किंवा आमदार किंवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही एक दस्ताऐवज सोबत आणावा लागणार आहे. निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेली छायाचि...

११ हजार विद्यार्थ्यांनी, महिलांनी मानवी साखळीतून साकारले भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली नोंद ·         वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ·         मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत अनोखा उपक्रम ·           वाशिम , दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदार जागृतीसाठी आज वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाली असून यामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ स्वीप ’ चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा सार्वत्रिक नि...

मतदान प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्वाची - प्रकाश बिंदू

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         सूक्ष्म निरीक्षकांची कार्यशाळा वाशिम , दि. १५ : मतदान केंद्रांवर नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांवर निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. मतदान प्रक्रिया शांतता व निःपक्षपातीपणे पार पाडण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असून सर्व सूक्ष्म निरीक्षकांनी सजग राहून काम करावे , अशा सूचना सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या सूक्ष्म निरीक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन , महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, मनुष्यबळ व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा अधीक्षक प्रशांत जाधव, श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह ७१ सूक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती. श्री. बिंदू म्हणाले , मतदानादिवशी होणाऱ्या ‘ मॉक पोल’चे सूक्ष्म निरीक्षकांनी सजग राहून सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडत असल्याची खात्री करावी. त्याच बरोबर प्रत्यक्ष मतदान...

सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांच्या मंगरूळपीर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी

Image
वाशिम , दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांनी आज मंगरूळपीर तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच या मतदान केंद्रांवर उपलब्ध असलेल्या किमान आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, मंडळ अधिकारी डी. जे. चौधरी, तलाठी भागवत भताने आदी उपस्थित होते. सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. बिंदू यांनी मंगरूळपीर तालुक्यातील लाठी, शेलूबाजार, चिखली, हिसई येथील मतदान केंद्रांची तसेच मंगरूळपीर शहरातील कलंदरिया उर्दू हायस्कूल येथील ४ मतदान केंद्र, अकोला चौक येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील चार मतदान केंद्रांची पाहणी केली. याठिकाणी दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, रँप, स्वच्छता गृह आदी सुविधांची पाहणी केली.

महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी अंगणवाडीसेविकांचा पुढाकार

Image
·         ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमात १ हजार १७४ अंगणवाडीसेविकांचा सहभाग वाशिम , दि. १२ : जिल्ह्यातील महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अंगणवाडीसेविकांनी पुढाकार घेतला आहे. ‘स्वीप’ अंतर्गत आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व १ हजार १७४ अंगणवाडीसेविका आपापल्या गावामध्ये मतदार जागृती करीत असून विशेषतः महिला मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून गावागावातील महिलांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अंगणवाडीसेविकांना मतदार जागृतीसाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. गावांमधील प्रमुख कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींवर ...