Posts
Showing posts from August, 2016
‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’मुळे मिळणार शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
- Get link
- X
- Other Apps
· जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद · महाराष्ट्र समृद्धी महामार्गाविषयी सादरीकरण · विकास कामांमध्ये भागीदारीमुळे होणार फायदा · युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार वाशिम , दि . २६ : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (सुपर कम्युनिकेशन हाय-वे) निर्मितीसाठी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ ने शेतकऱ्यांनी आपली जमीन उपलब्ध करून दिल्यास त्यांना भूसंपादनाच्या इतर पद्धतींपेक्षा सर्वाधिक मोबदला मिळणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची सोय होणार असून शेतकऱ्यांसाठी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी भूसंपादन अधिकारी अनि...
वाशिमकरांनी घेतली सामाजिक ऐक्याची प्रतिज्ञा
- Get link
- X
- Other Apps
· ‘सदभावना दिना’निमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम · सदभावना रॅलीत विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाशिम , दि . २० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २० ऑगस्ट हा दिवस सदभावना दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथून सदभावना रॅलीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी सर्व उपस्थितांनी सदभावना दिनानिमित्त सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डी. एच. जुमनाखे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ए. डी. मानक...
सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
- Get link
- X
- Other Apps
तोंडगाव येथील शेततळ्यामध्ये जलपूजन वाशिम , दि . १५ : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे विकेंद्रित जलसाठे निर्माण होत आहेत. यामधील पाण्याचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याच्या बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमधून वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे तयार करण्यात आलेल्या तळ्यामध्ये जलपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार बळवंत अरखराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर आदी उपस्थित होते. ना. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे....
‘सायबर लॅब’मुळे गुन्ह्यांचा तपास गतीने होणार - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . १५ : सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाराष्ट्र सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक सायबर लॅबची निर्मिती करण्यात आली असून या लॅबमुळे गुन्ह्यांचा तपास गतीने करून गुन्हेगारांवर वचक बसविता येणार असल्याचे प्रतिपादन असल्याचे राज्याच्या बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण केले. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. हर्षदा देशमुख, वाशिम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमच्या नगराध्यक्ष सौ. लताताई उलेमाले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. ना. चव्हाण म्हणाले की, आज गुन्हेगारांकडून इंटरनेट व अद्ययावत तंत्रज्ञानाचा व...
कृषी क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
- Get link
- X
- Other Apps
· भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात · जलयुक्त शिवार अभियातील लोकसहभागात वाढ · ‘ स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी ’ उपक्रम राबविणार वाशिम , दि . १५ : शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता राज्य शासन कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या योजना, उपाययोजनांना यश मिळत क्षेत्राच्या असल्याचे राज्याच्या बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. हर्षदा देशमुख, वाशिम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक, कारंजा-मानोरा...
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘सायबर लॅब’
- Get link
- X
- Other Apps
· १५ ऑगस्ट रोजी होणार उदघाटन · राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती · सायबर गुन्ह्यांच्या तपासाला येणार गती वाशिम , दि . १३ : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाराष्ट्र सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक सायबर लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक १५ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १० वाजता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लॅबचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली आहे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असून इंटरनेटचा वापर वाढला आहे. ई-बँकिंग, ई-ऑफिस, ई-डॉक्युमेंटसारख्या संकल्पनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून इंटरनेट व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या सायबर गुन्ह्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर निय...
‘स्वच्छ भारत अभियाना’त लोकसहभाग वाढण्याची गरज - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . ११ : स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळणे गरजेचे आहे. लोकसहभाग मिळालेली योजना अथवा अभियानाची अंमलबजावणी गतीने होण्यास मदत होते, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. स्वच्छतेसाठी झटणारे सफाई कामगार व सामाजिक संस्था यांच्या सन्मानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी वाशिमच्या नगराध्यक्ष लताताई उलेमाले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. मोरे, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. आपण स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घरातील कचरा उचलून बाहेर टाकतो. त्यामुळे घराचा परिसर अस्वच्छ बनतो. पर्यायाने गल्ली, शहर, गाव अस्वच्छ बनते व त्यामुळे रोगराई पसरते. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून स्वच्छतेचा आग्रह धरला पा...
महिलांमध्ये प्रत्येक जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता - आमदार अमित झनक
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . ०६ : आज महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. या क्षेत्रांमध्ये सोपविण्यात येत असलेली प्रत्येक जबाबदारी सक्षमपणे सांभाळून यशस्वी होण्याची क्षमता महिलांमध्ये असल्याचे प्रतिपादन रिसोड-मालेगावचे आमदार अमित झनक यांनी केले. महसूल सप्ताह निमित्त राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आयोजित महिला समाधान शिबिराप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अंजली शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार माजी नगराध्यक्षा भारती क्षीरसागर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष दत्तात्रय खराडे, दंत चिकित्सक डॉ. कीर्ती पाटील, डॉ. विजयप्रसाद तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. झनक म्हणाले की, राज्य शासनाने महसूल सप्ताहनिमित्त महिला सक्षमीकरणविषयी अभियान राबवून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. राज्य शासनाचा हा उप्रकम अतिशय कौतुकस्पद आहे. महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. यासाठी महिलांनी महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महिला ज्या क्षेत्रात जातात, त...
महिलांनी आपल्यामधील क्षमता ओळखण्याची गरज - आमदार लखन मलिक
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . ०६ : एकावेळी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळून प्रगती साधण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिलांनी आपल्यामधील क्षमता ओळखल्याशिवाय त्या सक्षम होणार नाहीत, असे मत वाशिम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक यांनी व्यक्त केले. महसूल सप्ताहानिमित्त वाटाणे लॉन येथे आयोजित महाराजस्व अभियानअंतर्गत महिला समाधान शिबाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाशिमच्या नगराध्यक्ष लताताई उलेमाले , उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप , तहसिलदार बळवंत अरखराव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद पाटील आदी उपस्थित होते . आमदार मलिक म्हणाले कि, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. महिलांनीही आपले हक्क, अधिकार समजून घेऊन त्याचा वापर स्वतःच्या व इतर महिलांच्या प्रगतीसाठी व सक्षमीकरणासाठी करावा. नगराध्यक्ष लताताई उलेमाले म्हणाल्या की, समाजात महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. महिलांना समानतेची वागणूक व उच्च शिक्षणाची संधी मिळायला हवी. प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याची शक्ती महिलांमध्ये असून त्यांना योग्य संधी मिळाली तर त्या प्रत्येक...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . ०३ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, उडीद, मुग, कापूस, खरीप ज्वारी या पिकांना सर्व महसूल मंडळांमध्ये लागू आहे. तीळ या पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये तर भुईमुग पिकासाठी मालेगाव व कारंजा तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव या तालुक्यातील सर्व महसूल मंडळांकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी भरावयाचा विमा हप्ता सोयाबीन पिकासाठी ७२० रुपये, मुग व उडीद पिकासाठी ३६० रुपये, तूर पिकासाठी ५६० रुपये, कापूस पिकासाठी १८०० रुपये, खरीप ज्वारीकारिता ४८० रुपये, भात पिकासाठी ७८० रुपये, भुईमुग पिकासाठी ६०० रुपये व तीळ पिकासाठी ४४० रुपये आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्...
जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . ०३ : थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याहस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणासाठी वाशिम तालुक्यात विविध उपक्रम
- Get link
- X
- Other Apps
· महसूल सप्ताहनिमित्त आयोजन · महिला आरोग्य शिबिराचे शुक्रवारी आयोजन वाशिम , दि . ०३ : राज्यात दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०१६ या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला असून यानिमित्त महिला सक्षमीकारणासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुक्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बलवंत अरखराव यांनी दिली आहे. दिनांक १ ऑगस्ट २०१६ रोजी वाशिम तालुक्यातील सर्व तलाठी साजाच्या ठिकाणी महसूल सप्ताहाच्या उदघाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयोजित सभेमध्ये महिलांना महसूल विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महिला शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. वाशिम तहसीलदार कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमामध्ये महसूलचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या हस्ते महिला मतदारांना मतदान ओळखपत्रांचे वाटपही करण्य...
नागरिकांना समाधानकारक सेवा देण्यासाठी तत्पर रहा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
- Get link
- X
- Other Apps
· महसूल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम · उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान वाशिम , दि . ०१ : महसूल विभाग हा सर्व प्रशासकीय विभागांमध्ये महत्त्वाचा विभाग मानला जातो. त्यामुळे या विभागाकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक व्यक्तीला समाधानकारक सेवा देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेहमी तत्पर राहिले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले कि, प्रशासकीय सेवेमध्ये प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेचे प्रयोजन लक्षात घेऊन काम केले पाहि...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
- Get link
- X
- Other Apps
वाशिम , दि . ०१ : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.