माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
· जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा मेळावा · ध्वजदिन निधी संकलनबद्दल सीईओ पाटील यांचा सत्कार वाशिम , दि . ३० : देशाची सेवा करून परत आलेल्या माजी सैनिकांना सर्वसामान्य नागरी जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज नियोजित सैनिक संकुलाच्या जागेवर आयोजित जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा यांच्या मेळाव्यात सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल आर. आर. जाधव, सैन्यामध्ये कर्नल पदापर्यंत पोहचून निवृत्त झालेले वाशिम जिल्ह्यातील निवृत्त कर्नल प्रवीण ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम दीपप्रज्ज्वलन व शहीद स्मारक स्मृती चिन्हाला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली. ध्वजदिन निधी संकलनात जिल्हा परिषदेने १२५ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांचा यावेळी शहीद स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसे...