Posts

मंगरुळपीर येथे समाज कल्याण योजनांच्या डिजीटल रथाचा शुभारंभ

Image
मंगरुळपीर येथे समाज कल्याण योजनांच्या डिजीटल रथाचा शुभारंभ         वाशिम, दि. 17 (जिमाका) :  मंगरुळपीर पंचायत समिती येथे आज 17 फेब्रुवारी रोजी समाज कल्याण योजनांच्या डिजीटल रथाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती हरिष महाकाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भाऊराव बेलखेडकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊत तसेच पंचायत समितीचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.            समाज कल्याण विभागाच्या निवडक महत्वपूर्ण योजनांची माहिती लाभार्थ्यांना व नागरीकांना व्हावी, तसेच ही माहिती जाणून घेवून लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने निवडक महत्वपूर्ण योजनांवर आधारीत दिशा परिवर्तनाची हा माहिती पट तयार केला आहे. या माहितीपटामध्ये जिल्हयातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई घरकुल योजना, मुला-मुलींसाठी वसतीगृहे योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास...

20 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन

Image
20 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन         वाशिम, दि. 17 (जिमाका) :  समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे तक्रारी व अडचणीचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हासतरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यखतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.            माहे, फेब्रुवारी 2023 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येत असल्याची माहिती सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वाशिम यांनी दिली. *******

शिवजन्मोत्सवानिमित्तजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान सप्ताह जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे जिल्हा शल्य चिकीत्सकाचे आवाहन

Image
शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान सप्ताह जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे जिल्हा शल्य चिकीत्सकाचे आवाहन         वाशिम, दि. 17 (जिमाका) :  शासकीय रक्तकेंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे शिवजन्मोत्सवा निमित्त वाढती रक्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी  १८ फेब्रुवारी ते  २४ फेब्रुवारीपर्यंत  रक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे. जिल्हयात रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय रक्त केंद्रामार्फत दररोज अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. जिल्हयात जवळपास ८० ते १०० सिकलसेल व थालासेमियाग्रस्त मुले आहेत. त्यांना प्रत्येक १५ ते २० दिवसाला रक्त पिशवीची गरज भासते. जिल्हा स्त्री रुग्णालय सुरू झाल्यामुळे जिल्हयातील गरोधर माता, प्रसूत माता यांना देखील रक्तपिशवीची आवश्यकता भासते. त्यामुळे शासकीय रक्तकेंद्रात रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी शासकीय रक्त केंद्रातर्फे  १८ फेब्रुवारी ते  २४ फेब्रुवारीपर्यंत  जिल्हयातील वेगवेगळ्या ठिकाणी पुढीलप्रमाणे रक...

मुर्तीजापूर येथे कलापथकाने केला समाज कल्याण योजनांचा जागर

Image
मुर्तीजापूर येथे कलापथकाने केला समाज कल्याण योजनांचा जागर         वाशिम, दि. 15 (जिमाका) :  समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने कलापथकाचे कार्यक्रम जिल्हयात सुरु आहे. मंगरुळपीर जवळील ग्रामपंचायत मंगळसा अंतर्गत येणाऱ्या मुर्तीजापूर येथील पंचशिल नगरातील बुध्द विहारात 14 फेब्रुवारी रोजी महात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था, उमरा (शम.) चे अध्यक्ष शाहीर संतोष खडसे आणि त्यांच्या सह कलावंतांनी कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण योजनांचा जागर मांडून माहिती दिली. यावेळी कलापथकाने उपस्थितांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना, मार्जिन मनी योजना, स्वाधार योजना, कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार, निवासी शाळा व वसतीगृहे योजना यासह अन्य योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी ग्रा.पं. सदस्य ममता अंभोरे, रामकृष्ण डेरे, विनोद डेरे, माजी ग्रा.पं. सदस्य कुसूम मनवर, पोलीस पाटील वि...

बालकांचे कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

Image
बालकांचे कायदेविषयक कार्यशाळा संपन्न           वाशिम, दि. 15 (जिमाका) :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, वाशिम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, तोंडगाव यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे अक्षय तृतीया या दिनी होणारे बालविवाह थांबविण्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बालासाहेब सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बालस्नेही वातावरण निर्मितीकरीता सर्व तालुक्यांमधे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) २०१५, बालकाचे लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६, या विषयावर जिल्ह्यातील ग्रामसेवक, मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटाच्या महिला यांचे नुकतेच प्रशिक्षण घेण्यात आले.           कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, संरक्षण अधिकारी भगवान ढोले, सामाजिक कार्यकर्ता अनंता इंगळे, राजामती ढोले यांनी बालस्नेही ...