Posts

शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवा - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

Image
·         उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान कार्यशाळेचा समारोप वाशिम , दि. १५ : शेतकऱ्यांचे उत्पन्न त्याच्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट करण्यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाविषयक कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक एस. आर. सरदार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले आदी उपस्थित होते. ना. फुंडकर म्हणाले की, तोट्यामध्ये असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी कृषी विभागाने उन्न...

शौचालय बांधकामासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे श्रमदान

Image
वाशिम , दि. १५ : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव व शेलूबाजार येथे स्वतः शौचालय बांधकाम करून नागरिकांना शौचालय उभारणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर व आमदार राजेंद्र पाटणी, मंगरूळपीर पंचायत समितीच्या सभापती नीलिमा देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ना. खोत यांनी सर्वप्रथम पेडगाव येथील लीलाबाई सातपुते यांच्या घरी सुरु असलेल्या दोन शोषखड्ड्यांच्या शौचालय बांधकामाला भेट दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी या दोन शोषखड्ड्याच्या शौचालयाचे फायदे सांगितले. तसेच हे शौचालय केवळ १० हजार रुपयांमध्ये उभारणे शक्य असल्याने सर्वसामान्य नागरिकांना फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ना. खोत यांनी स्वतः श्रमदान करून शौचालय उभारणीस हातभार लावला. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार राजेंद्र पाटणी यांनीही त्यांना...

‘नाफेड’च्या तूर खरेदी केंद्रांना सात दिवसांची मुदतवाढ - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

Image
·         राज्यात सुमारे ३३ लाख क्विंटल तूर खरेदी ·         शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील ·         शेतमालाला भाव देण्यासाठी खासगी बाजारला परवानगी वाशिम , दि. १५ : शेतकऱ्यांनी ‘नाफेड’ केंद्रांवर आणलेली शिल्लक तूर खरेदी करण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. कारंजा येथे कृष्णा कृषी बाजारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे होते. याप्रसंगी कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, तुळजापूर ग्राममंडळाचे अध्यक्ष गंगाधर पाटील येवरतकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ज्ञानेश्वर खाडे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, कृष्णा कृषी बाजारचे रविकुमार चांडक आदी उपस्थित होते. ना. फुंडकर म्हणाले की, राज्यातील ३०० नाफेड खरेदी केंद्रांवर आतापर्यंत सुमारे ३३ लाख क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न...

जिल्हाधिकारी कार्यालयातील डिजीधन मेळाव्यात ‘भीम’ अॅप विषयी मार्गदर्शन

Image
वाशिम ,  दि .  १४  :     जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या डिजीधन मेळाव्यामध्ये ‘भीम’ अॅपच्या वापराविषयी तसेच रोखरहित व्यवहाराच्या इतर पर्यायांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने ‘भीम’ अॅपची निर्मिती केली आहे. सर्वसामान्य नागरिकालाही अतिशय सहजपणे हे अॅप वापरता येते, हे या अॅपचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या अॅपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सुरु करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अभिषेक काळे यांनी यावेळी उपस्थितांना पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या सहाय्याने  ‘भीम’ अॅप व स्टेट बँकेच्या इतर अॅपविषयी माहिती दिली. यामध्ये त्यांनी ‘भीम’ अॅप कशाप्रकारे डाऊनलोड करावे, त्याचे रजिस्ट्रेशन, पैशांची देवाण-घेवाण आदी बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·          सामाजिक समता सप्ताहाचा समारोप वाशिम ,  दि .  १४  :     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. त्यांनी अतिशय कमी कालावधीत विविध शास्त्रांच्या पदव्या संपादन केल्या. कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे युवा वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचे विचार आत्मसात करावेत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, सामाजिक कार्यकर्ते अनंतकुमार जुमडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अर्थात १४ एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासने घेतला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला...