शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रभावी व्यासपीठ पालकमंत्री दत्तात्रय भरणे ..शेतकरी बांधवांसाठी वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' कार्यान्वित
'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रभावी व्यासपीठ
पालकमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकरी बांधवांसाठी
वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' कार्यान्वित
वाशिम, दि. २४ मे (जिमाका) शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष हे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवा अध्याय ठरेल. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. बाजारभाव, थेट खरेदीदारांशी संपर्क आणि आधुनिक विपणन प्रणालींचा उपयोग करून स्वतःचे उत्पन्न वाढवावे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
वाशिम जिल्ह्यातील शेतीला बाजारपेठेचे सक्षम दालन मिळावे, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि त्यांच्या मालाचे मूल्यवर्धन व्हावे यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असून सोयाबीन, तूर, गहू, कापूस, चिया, हळद, फळे आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र विक्री व्यवस्थेतील मर्यादा, अपुऱ्या माहितीची उपलब्धता आणि काढणीपश्चात होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. ही समस्या लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
प्रकल्पाची गरज :
• किंमतीतील अस्थिरता आणि मध्यस्थांचे शोषण
• बाजारपेठेतील माहितीचा अभाव
• काढणीपश्चात साठवण व हाताळणीतील अडचणी
• थेट बाजारपेठेचा अभाव
• संघटित विपणन व्यवस्थेचा अभाव
• स्थानिक मूल्यवर्धनाची अंमलबजावणी अपुरी
प्रकल्पाची उद्दिष्ट्ये :
• बाजार माहिती केंद्र
• थेट संपर्क सुविधा
• देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विपणन
• काढणीपश्चात नुकसान कमी करणे
• FPOs ना चालना
• स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन
'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातील पूल आहे. एफपीओ आणि एफपीसी यांच्याकडून उत्पादनाची माहिती घेऊन, देशभरातील खरेदीदारांशी संपर्क साधून, योग्य दरात व्यापार शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा
कार्यपद्धती :
1. एफपीसी/एफपीओ कडून नोंदणी व उत्पादनाची माहिती
2. खरेदीदारांशी संपर्क साधून समन्वय
3. कृषी विपणन कक्षाच्या देखरेखीखाली व्यवहार
संपर्क :
ईमेल : washimshetishilp@gmail.com
फोन : 8237410073
असे कृषी विभागाने कळविले आहे.
Comments
Post a Comment