Posts

वाशिम शहरात अमृत कलश यात्रा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांची उपस्थिती

Image
वाशिम शहरात अमृत कलश यात्रा  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांची उपस्थिती वाशिम दि.19 (जिमाका) " माझी माती माझा देश " अभियानातंर्गत आज 19 सप्टेंबर रोजी नगर परिषद,वाशिमच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड,सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,निवासी नायब तहसीलदार साहेबराव नपते व नगर परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.                      जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी या मातीला नमन करून देशासाठी लढणाऱ्या वीरांना वंदन केले.हे अभियान देशासाठी आपले जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त करून या अभियानात शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक नागरिकांनी योगदान दयावे.तसेच शहरातील प्रत्येक वार्डातून अमृत कलश यात्रेचे आयोजन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी करावे. शहरातील प्रत्येक कुटूंबांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा करण्यासाठी आपले योगदान दयावे.असे श्रीम...

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ दया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे शिबीर

Image
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ दया                                                                     जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे शिबीर        वाशिम, दि. 18 (जिमाका)  :  दिव्यांग बांधव हे समाजाचे महत्वाचे घटक आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ दयावा. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.            आज 18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी...

मेरी माटी मेरा देश अभियानाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात अमृत कलश तयार करण्यासाठी माती गोळा करणार सर्वांनी सक्रीय सहभाग दयावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Image
मेरी माटी मेरा देश अभियानाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात अमृत कलश तयार करण्यासाठी माती गोळा करणार सर्वांनी सक्रीय सहभाग दयावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन        वाशिम, दि. 18 (जिमाका)  :   आझादी का अमृत महोत्सव व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अमृत महोत्सव कार्यक्रमाबाबत "मेरी माटी मेरा देश" अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होणे अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक गावाचा एक अमृत कलश तयार करण्यासाठी प्रत्येक घरातून माती गोळा करून ज्या कुटुंबाकडे शेती आहे, त्यांच्या शेतातील एक मुठ माती जमा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे माती उपलब्ध नाही अशा कुटुंबाकडून एक चिमुटभर तांदूळ त्या मातीच्या कलशामध्ये जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.           या अभियानाची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. नागरिकांनी भव्य उत्सवी स्वरूपाच्या वातावरणात ढोल...

आयुष्मान भव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

Image
आयुष्मान भव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप        वाशिम, दि. 18 (जिमाका)  :   आयुष्यमान भव या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे उद्घाटन 13 सप्टेंबर रोजी वाशिम येथे आमदार लखन मलिक व आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनील कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश परभणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नि:क्षय मित्र व टी.बी.चॅम्पियन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपचारावरील क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी स्वयंस्फूर्तीने नि:क्षय मित्र बनण्याचे जिल्ह्यातील जनतेला व सामाजिक संस्थांना आवाहन केले. जेणेकरून जिल्ह्यातील सर्व उपचारावरील क्षयरुग्ण पोषण आहारापासून वंचित राहणार नाही. *******

ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारीसाठीध् वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त. जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत

Image
ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारीसाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत        वाशिम, दि. 18 (जिमाका)  :  श्री गणेशोत्सव 2023 च्या अनुषंगाने जिल्हयातील ध्वनी प्रदुषण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषणाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषणाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक व नियंत्रण कक्ष, वाशिम येथील व्हॉट्सॲप क्रमांक व ई-मेल आयडीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.          जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी पुढीलप्रमाणे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम सुनिलकुमार पुजारी, (7385300444), दूरध्वनी क्रमांक 07252-232545, वाशिम शहर पोलीस स्टेशन- पोलीस निरीक्षक गजानन धंदर (9823236034), दूरध्वनी क्रमांक 07252-232100, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेश...