Posts

शिरपूर (जैन) येथे चातुर्मासासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळा

Image
शिरपूर (जैन) येथे चातुर्मासासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळा                                                                     जिल्हाधिकारी षण्मुगराजन           वाशिम, दि.  23  (जिमाका) :  जैन धर्मियांचे मुनीराज आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा शिरपूर (जैन) येथे चातुर्मास सध्या सुरु आहे. या चातुर्मासादरम्यान देशातील विविध राज्यातील भाविक दर्शनासाठी शिरपूर (जैन) येथे मोठया संख्येने येत आहे. चातुर्मासानिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्ते व परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच आवश्यक त्या सुविधा तेथे तातडीने उपलब्ध करुन दयाव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन...

गणेशोत्सव आनंदात साजरा करतांना मार्गदर्शक तत्वांचे पालन व्हावे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

Image
गणेशोत्सव आनंदात साजरा करतांना मार्गदर्शक तत्वांचे पालन व्हावे                                                                     जिल्हाधिकारी षण्मुगराजन समन्वय व शांतता समितीची सभा           वाशिम, दि.  23  (जिमाका) :  मागील दोन वर्ष कोरोना संसर्गाच्या काळात गेली. कोरोना संसर्ग संपूर्णपणे आजही गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोनाविषयक निर्बंध पुर्णपणे हटविण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी आनंदात साजरा करतांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे प्रत्येकाने पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.   ...

स्टार्टअप व नाविन्यता यात्रा 25 ऑगस्टपासून जिल्हयात

Image
स्टार्टअप व नाविन्यता यात्रा 25 ऑगस्टपासून जिल्हयात        वाशिम, दि.  23  (जिमाका) :  नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत “ महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018 ” जाहिर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात स्टार्टअपच्या विकासाकरीता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यामधून यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी तसेच राज्यातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या यात्रेचे आगमन 25 ऑगस्टला होणार आहे.          25 ऑगस्ट रोजी मानोरा तालुक्यातील मानोरा येथे दुपारी 2 वाजता मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय येथे. दुपारी 4 वाजता बस स्टॅन्ड चौक मानोरा. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कारंजा (लाड) येथील विद्याभारती कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय. सकाळी 11 वाजता के. एन. महाविद्यालय.  दुपारी 12 वाज...

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबित अर्ज लॉगीनला विहीत मुदतीत सादर करा

Image
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबित अर्ज लॉगीनला विहीत मुदतीत सादर करा             वाशिम, दि.  23  (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर ऑनलाईन योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यान्वीत करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाचे महाडिबीटी पोर्टलवरील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील हे अर्ज पुढील महाविद्यालयाचे स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे महाडिबीटी प्रणालीवरील डॅशबोर्डनुसार दिसून येते.          मदर टेरेसा नर्सिंग कॉलेज, वाशिम, शिवशक्ती नर्सिंग इन्सटिटयुट, काटा, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम, गोदावरी मॉडर्न डिग्री कॉलेज, केनवड, सन्मती इंजिनियरिंग कॉलेज, सावरगांव बर्डे, पारेश्वर विद्यालय, पार्डी टकमोर, स्वामी विवेकानंद विद्यालय...

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा

Image
शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा          वाशिम, दि. 23 (जिमाका) : खरीप हंगाम सन 2022 या वर्षात पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विमा कंपनी ऑफ इंडियाच्या जिल्हयातील तालुका समन्वयकांशी संपर्क साधावा. तालुका समन्वयक, त्यांचे नांव, भ्रमणध्वनी क्रमांक व तालुका पुढील प्रमाणे आहे. वाशिम तालुका- परमेश्वर विभुते (8459252717) ऑफीस क्रमांक 8, बुस्केटवार कॉम्प्लेक्स, नवोदय विद्यालयाजवळ, काटा रोड, वाशिम. कारंजा तालुका- भुषण शिकारे, (9766969394) लाला बापु कॉम्प्लेक्स, धाबेकर कॉलेजसमोर कारंजा. मालेगांव तालुका- नितेश वाघ (9158231791) गोयंका नगर, महाराष्ट्र बँकेजवळ, मालेगांव. मंगरुळपीर तालुका- गोपाल नवघरे (9881812113) संजिवनी सोसायटी, संभाजीनगर, बायपास रोड, मंगरुळपीर. मानोरा तालुका- देविदास शिंदे (9146927137), सेवालाल कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेजवळ, मानोरा आणि रिसोड तालुका- श्रीकृष्ण ढाकणे (8698491195), समर्थनगर, सिव्हील लाईनरोड, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, रिसोड या भ्रमणध्वनीवर तसेच दिलेल्या कार्यालयाच्या पत्यावर संबंधित तालुक्यातील शेतक...