Posts

प्रत्येक उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काळजीपूर्वक लक्ष ठेवा - नरेंदर सिंग

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ·         कारंजा येथील निवडणूक खर्च कक्षाला भेट वाशिम , दि. २९ : निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी विविध पथकांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या खर्चाची नोंद त्यांच्या शॅडो रजिस्टरमध्ये करावी, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी आज दिल्या. कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी कारंजा उपकोषागार कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाला भेट देवून तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे , सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, निवडणूक खर्च निरीक्षक श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. सिंग म्हणाले , विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जावू नये...

निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांची राजगाव येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट

Image
वाशिम , दि. २८ : निवडणूक रोकड, अवैध दारू तसेच शस्त्रास्त्रे यांची वाहतूक होवू नये, याकरिता जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यापैकी वाशिम हिंगोली मार्गावर राजगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाला आज निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी भेट दिली. तसेच या पथकाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. यावेळी श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार उपस्थित होते. श्री. सिंग म्हणाले, स्थिर सर्वेक्षण पथकातील प्रत्येक व्यक्तीने जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची काळजीपूर्वक तपासणी करावी. कोणत्याही परिस्थितीत रोकड, अवैध दारू, शस्त्रे अथवा इतर संशयास्पद वस्तूची वाहतूक होवू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच वाहनांची तपासणी करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग जिल्ह्यात दाखल

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ वाशिम ,   दि .   २७   :   विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांकरिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नरेंदर सिंग यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. ते आज जिल्ह्यात दाखल झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांची भेट घेवून त्यांनी निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन , उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव , निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे , श्याम गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग हे वाशिम शासकीय विश्रामगृह येथील काटेपुर्णा कक्षामध्ये येथे सोयीनुसार नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७८२०८८०६०१असा आहे. या क्रमांकावर नागरिक निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्क साधू शकतात , असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

Image
·         कुटुंबातील व परिसरातील मतदारांना करणार आवाहन ·         ‘स्वीप’अंतर्गत सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी घेतली शपथ वाशिम, दि. २५ : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृतीविषयक उपक्रमांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सुध्दा सहभागी होत आहेत. त्यानुसार आज जिल्ह्यातील विविध विद्यालये, महाविद्यालयांमधील सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थींनी मतदार जागृतीसाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. मतदारांना आपल्या मताचे महत्व पटवून देण्यासाठी ‘स्वीप’ समितीमार्फत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून या विद्यार्थ्याचे पालक व कुटुंबातील इतर मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. याकरिता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच...

निवडणूक विषयक विविध बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Image
·         मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना वाशिम, दि. २५ : विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून यादिवसापासूनच निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली पूर्वतयारी आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, वाशिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, रिसोड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, ...