Posts

शेतकऱ्यांना मागणीनुसार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
• ‘आत्मा’ नियामक मंडळाची आढावा सभा • सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वाशिम, दि. ३१ : शेतकरी गटामध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तसेच त्यांच्या मागणीनुसार त्यांना प्रशिक्षण, अभ्यास दौरा, प्रात्यक्षिक व शेतीशाळा आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हाउपनिबंधक रमेश कटके, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, अशासकीय सदस्य गोपाळराव लुंगे, विठ्ठलराव आरु आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा ...

स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
वाशिम ,   दि .   २९ :   जिल्ह्यात वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. याकरिता राज्य शासनामार्फत दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वसामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उप वन संरक्षक श्री. वळवी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष ला...

पीक कर्जविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक बँकेने तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक करावी - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·          बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत पीक कर्ज वाटपाचा आढावा ·          ५० हजार रुपयेपर्यंतच्या कर्जाला नो-ड्युजची गरज नाही ·          प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्केल ऑफ फायनान्सनुसार कर्ज द्या वाशिम ,   दि .   २९ :   शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या पीक कर्जविषयक तक्रारींचे निराकरण तातडीने होण्यासाठी सर्व बँक शाखांमध्ये तक्रारी निवारण अधिकाऱ्यांची नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. आतापर्यंत झालेल्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे विकास प्रबंधक विजय खंडरे यांच्यासह विविध बँकाच...

कर्जमाफीसाठी अर्ज सादर करण्यास ५ जून पर्यंत मुदतवाढ

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ·         योजनेची व्याप्ती वाढली; ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक वाशिम , दि . २६ : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी २००१ ते २०१६ या कालावधीत घेतलेल्या थकीत राहिलेल्या कर्जाचा समावेशही या योजनेत करण्यात आला आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ५ जून २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेत दि. १   एप्रिल २००१ ते दि. ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्जाची दि. ३० जून २०१६ रोजी थकीत रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून दि. ३१ जुलै २०१७ पर्यंत पीक कर्ज, पुनर्गठन केलेले व मध्यम मुदतीचे मुद्द...

कृषि विभागाच्या शिपाई, चौकीदार भरतीसाठी जमा केलेले परीक्षा शुल्क परत मिळणार

·         दि. ३१ मे पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन वाशिम , दि . २६ : अमरावती विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयाने शिपाई, चौकीदार पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने घेण्याकरिता दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी जाहिरात दिली होती. ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून ज्या उमेदवारांनी या पदांसाठी आवेदन पत्र सादर केले व त्याबरोबर परीक्षा शुल्क डीडीद्वारे जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयास जमा केले होते, त्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क संबंधितांना परत केले जाणार आहे. याकरिता संबंधित उमेदवारांनी रक्कम भरल्याची पावती व फॉर्म, उमेदवाराचा बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड, उमेदवाराचे ओळखपत्र व बँक पासबुकची पहिल्या पानाची सुस्पष्ट छायांकित प्रत दि. ३१ मे २०१८ पर्यंत वाशिम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावी. वरील माहिती व कागदपत्रे विहित कालावधीत जमा न केल्यास परीक्षा शुल्काची रक्कम मिळणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.