Posts

कारंजा येथील रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची निवड

Image
वाशिम , दि . ०१ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कारंजा येथील एस. एस. एस. के. आर. इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती एच. एस. सी. व्होकेशनल  कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक अ. सं. ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याची गरज आहे. स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळण्याची अपेक्षा न ठेवता अनुभवातून कौशल्य विकसित करण्यास युवकांनी प्राधान्य द्यावे, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत म्हणाले, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. विविध क्षेत्रात प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. त्या...

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी वाशिम दौरा

वाशिम , दि . ३० :   राज्याच्या महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दि. २ डिसेंबर २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. ना. पाटील हे दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता अकोला येथून वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे वाशिम येथे आगमन होईल. याठिकाणी आयोजित नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक होईल. त्यानंतर ना. पाटील हे वाशिम शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता ते वाहनाने यवतमाळकडे रवाना होणार आहेत.

वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीच्या प्राथमिक बैठकीत विविध विषयांवर चर्चा

वाशिम , दि . ३० :   वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या अनुषंगाने आज प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली व दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा जिल्हा गॅझेटियरच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा गॅझेटियरच्या संपादकीय मंडळाचे सदस्य प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे, ‘काव्याग्रह’चे विठ्ठल जोशी, प्रा. गजानन वाघ, मोहन शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, कृषि, उद्योग, बँकिंग, व्यापार, व्यवसाय, दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती यासह प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. या प्रत्येक विषयांवर स्वतंत्र प्रकरण जिल्हा गॅझेटियरमध्ये समाविष्ट असणार आहे...

दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

Image
·         वाचन चळवळ वाढीसाठी झाले विचारमंथन ·         काव्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद वाशिम , दि . ३० :   राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील एस. एम. सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायणजी जोशी सभागृह येथे आयोजित दोन दिवशीय ‘ग्रंथोत्सव २०१७’ चा आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे, प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे आदी उपस्थित होते. या ग्रंथोत्सवामध्ये आयोजित परिसंवाद, मुलाखतीमधून वाचन चळवळीच्या अनुषंगाने विचारमंथन झाले.ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे स्वयंसेवक व सार्वजनिक वाचनालयांचे प्रतिनिधी यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना श्...

महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाची ‘महाखादी यात्रा’ वाशिम शहरात दाखल

Image
·         जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन ·         खादी व ग्रामोद्योगी वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन वाशिम , दि . ३० :   महाराष्‍ट्र राज्‍य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या १५० व्‍या जयंतीनिमित्‍त   राज्‍यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.   या यात्रेला दि. ९ ऑक्‍टोबर २०१७ रोजी   मुंबई येथील राजभवन येथून सुरुवात   झाली असून ही महाखादी यात्रा आज वाशिम शहरात दाखल झाली. या महाखादी यात्रेनिमित्त पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथील सभागृहात तीन दिवस खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्...