Posts

बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्याला दहा हजार रुपयेपर्यंतच्या तातडीच्या कर्जाचे वाटप करावे - किशोर तिवारी

Image
·         जिल्हधिकारी कार्यालयात आढावा बैठक ·         कर्ज वाटपाबाबतचा फलक प्रत्येक बँकेत लावा ·         प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी रविवारीही बँक सुरु राहणार वाशिम , दि . २८ : राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांपर्यंतचे तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सर्व बँकांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांकडून सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ देण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी तथा प्र...

कर्जमाफीमुळे संकटातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला - किशोर तिवारी

Image
·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न ·         अर्ज प्रक्रियेमुळे प्रामाणिक शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळेल वाशिम , दि . २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ अखेर थकीत असलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना अतिशय फायदा झाल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. श्री. तिवारी म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ केले आहे. याकरिता पात्र शेतकऱ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्...

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी

Image
वाशिम , दि . २८ : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल. डॉ. अनिल कावरखे उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे शेतकरी, शेतमजूर व अत्यंत गरीब कुटुंबातील असतात. त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. तिवारी यांनी यावेळी दिल्या. त्यांनी रुग्णालयातील सर्जिकल वॉर्ड, जनरल वॉर्ड, एसएनसीव्ही युनिट, ओपीडीला भेट देवून याठिकाणी पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तसेच येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना रूग्णालयामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.

जिल्ह्यातील प्रत्येक ऑनलाईन सातबारा अचूक बनवा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
·         जिल्हाधिकारी कार्यलयात महसूल विभागाची आढावा बैठक ·          ‘एटीडीएम’द्वारे मंडळ स्तरावर मिळणार ऑनलाईन सातबारा, जुने अभिलेख ·         जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक ·         शालेय स्तरावरही दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना वाशिम , दि . २७ : नागरिकांना अचूक ऑनलाईन सातबारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चावडी वाचन मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के ऑनलाईन सातबाराचे चावडी वाचन झाले आहे, ही अतिशय चांगली बाब असून या मोहिमे अंतर्गत निदर्शनास आलेल्या त्रुटींची दुरुस्ती करून प्रत्येक ऑनलाईन सातबारा अधिकाधिक अचूक बनविण्याच्या सूचना अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, महसूल उपायुक्त प्रदीप पुरी, निवासी उपजिल्हाधिका...

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हस्ते वाशिम तहसील कार्यालयातील ‘एटीडीएम’ कार्यान्वित

Image
वाशिम , दि . २७ :  नागरिकांना कमी कालावधीत ऑनलाईन सातबारा व जुन्या अभिलेखांच्या प्रती मिळाव्यात, याकरिता आज अमरावती महसूल विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हस्ते आज वाशिम तहसील कार्यालयात एनी टाईम डॉक्युमेंट्स मशीन (एटीडीएम-क्यू ऑस) कार्यान्वित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, महसूल उपायुक्त प्रदीप पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.  एटीएम मशिन प्रमाणेच कार्यपध्दती असलेल्या या एटीडीएम मशिनमधून ऑनलाईन सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी पाच प्रकारच्या अभिलेखांच्या प्रती मिळविता येणार आहेत. या मशीनद्वारे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील नागरिकांचे सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हक्क नोंदणी रजिस्टर, पेरेपत्रक व सातबाराची प्रत मिळविण्याकरिता गट नंबर किंवा सर्व्हे नंब...