Posts

प्रत्येक पदवीधर मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         ओळखपत्र म्हणून १४ दस्ताऐवज ग्राह्य धरणार ·         मतदान वैध ठरण्यासाठी पहिला पसंतीक्रम देणे आवश्यक वाशिम , दि . ३० : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पदवीधर मतदाराने यावेळी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, मतदान नोंदविण्यासाठी मतदान केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांकडून जांभळ्या शाईचा स्केचपेन पुरविण्यात येईल. त्या पेनने आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावाच्या पुढे ‘१’ हा अंक भारतीय, रोमन कि...

मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘बीएलओ’ करणार मदत

·         जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची माहिती ·         अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक ·         सर्च इंजिनद्वारेही मतदान केंद्राविषयी माहिती मिळणार वाशिम , दि . २४ : दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वा. या कालावधीत अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७३६ मतदार २९ मतदान केंद्रांवर आपला हक्क बजावणार आहेत. पात्र मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्च इंजिनद्वारेही ऑनलाईन पध्दतीने मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेता येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे. वाशिम तालुक्यातील सुधीर चौरे (भ्र.क्र. ९८८१७५८८८५), ए. जे. घुगे (भ्र.क्र. ९८५०८८०८२०), रमेश आरु (भ्र.क्र. ९४२२०३६१४०), प्रशांत बोरकर (भ्र.क्र. ९७८०१११००१), अनिल काठेकर (भ्र.क्र. ९४२१८३१९८७), आर. एन. बोरकर (भ्र.क्र. ९४२०८३८९५५) यांची वाशिम व व्ही. डी. ढवळे ...

पदवीधर मतदारांना संकेतस्थळावर मिळणार मतदान केंद्राची माहिती

वाशिम , दि . २६ :   अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१७ करिता दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होत आहे. याकरिता पात्र मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती संकेतस्थळावर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे. नवीन पदवीधर मतदार यादी तयार करण्यात आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, याकरिता उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक, पत्ता व मतदान केंद्राची माहिती www.washim.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे आडनाव व नाव टाईप केल्यानंतर पात्र पदवीधर मतदारांना त्यांचा अनुक्रमांक, नाव, पत्ता व मतदान केंद्राची माहिती मिळेल. तरी पदवीधर मतदारांनी या संकेतस्थळावर जावून आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती करून घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी कळविले आहे.

वाशिम येथे सात हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारली ‘स्वच्छ भारत अभियान’च्या लोगोची मानवी शृंखला !

Image
·         ' गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ' ने घेतली दखल वाशिम , दि . २६ :   ' ना गंदगी करेंगे , ना करने देंगे ' असाचा मंत्र घेऊन वाशिम शहरातील ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज प्रजासत्ताक दिनी ‘स्वच्छ भारत अभियान’चा बोधचिन्ह (लोगो) असलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याची मानवी शृंखला साकारली. जिल्हा प्रशासन व वाशिम नगरपरिषदेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची दखल विश्व विक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने घेतली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमाप्रसंगी वाशिम शहरातील ३० शाळा, महाविद्यालयातील ७ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी ‘स्वच्छ भारत अभियान’च्या जनजागृतीसाठी एकत्र जमले होते. वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो असलेला महात्मा गांधींच्या चष्म्याच्या आकाराची मानवी शृंखला साकारली. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाची दखल ...

वाशिम येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
वाशिम , दि . २६ :   जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात साजरा करण्यात आला . पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राखीव पोलीस निरीक्षक देविदास इंगळे यांच्या पथकाने ध्वजाला सलामी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदाताई देशमुख, खासदार भावनाताई गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तसेच कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सानिकांना यावेळी पालकमंत्री ना. राठ...