उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढअधिकाधिक पत्रकारांनी सहभागी होण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन


उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अधिकाधिक पत्रकारांनी सहभागी होण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

वाशिम, दि. १२ फेब्रुवारी (जिमाका): माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी, २०२५ अशी होती. 
परंतु जिल्ह्यात अल्प प्रतिसाद पाहता या स्पर्धेला २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. 
किंवा 
 dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर