ॲग्री स्टॅक: शेतीसाठी डिजिटल क्रांतीएक शाश्वत भविष्याची दिशा
ॲग्री स्टॅक: शेतीसाठी डिजिटल क्रांती एक शाश्वत भविष्याची दिशा भारत कृषिप्रधान देश असून, आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्री स्टॅक योजना सुरू केली आहे. ही योजना १४ ऑक्टोबर २०२५ पासून देशभर लागू होत असून, शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय उघडत आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यत: कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाने शेतकरी बांधवांकरीता अग्रिस्टॅक ही योजना १४ ऑक्टोबर २०२५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे स्वत:चे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार होणार आहे. हा फार्मर आयडी तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळणार आहे. पिक कर्ज मिळविण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता येईल. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापण अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणीकरण...