Posts

Showing posts from 2025

ॲग्री स्टॅक: शेतीसाठी डिजिटल क्रांतीएक शाश्वत भविष्याची दिशा

Image
ॲग्री स्टॅक: शेतीसाठी डिजिटल क्रांती एक शाश्वत भविष्याची दिशा भारत कृषिप्रधान देश असून, आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्री स्टॅक योजना सुरू केली आहे. ही योजना १४ ऑक्टोबर २०२५ पासून देशभर लागू होत असून, शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय उघडत आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यत: कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाने शेतकरी बांधवांकरीता अग्रिस्टॅक ही योजना १४ ऑक्टोबर २०२५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे स्वत:चे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार होणार आहे. हा फार्मर आयडी तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळणार आहे. पिक कर्ज मिळविण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता येईल. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापण अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणीकरण...

सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया पालकमंत्री हसन मुश्रीफ...पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया    पालकमंत्री हसन मुश्रीफ पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशिम, दि. २६ जानेवारी (जिमाका) : आपला जिल्हा निति आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. ही ओळख पुसण्यासाठी आपण प्रयत्न करु. वाशिम जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केले.        आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे...

प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Image
सर्वांच्या सहकार्यातून वाशिम जिल्ह्याचा विकास करुया! पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आरोग्य, शेती, व रोजगार क्षेत्रात विशेष प्रयत्न. #वाशिम #RepublicDay2025 आरोग्य क्षेत्रात वाशिम जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी! पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "100% लसीकरण पूर्ण, OPD संख्या दीडपट वाढ, जिल्हा रुग्णालय चार महिन्यांपासून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे." #HealthCare #Development शेतकऱ्यांसाठी दिलासा! पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले, "पीक कर्जवाटपात 1,227 कोटींची मदत झाली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 3 लाखाहून अधिक शेतकरी संरक्षित आहेत." #Agriculture #Farmers मनरेगा अंतर्गत जलसंधारण उपक्रमाला गती! पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "प्रती एक एकरवर, एक जलतारा योजनेतून भुजल पातळी वाढवण्यासाठी 10 लाख जलतारांची कामे सुरू आहेत." #SustainableDevelopment #MGNREGA ऑपरेशन द्रोणागिरी: कृषी क्षेत्रासाठी नवी दिशा! पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केले, "ड्रोन तंत्रज्ञ...

ऑपरेशन द्रोणागिरी: वाशिम जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख

Image
विशेष लेख  ऑपरेशन द्रोणागिरी: वाशिम जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांतून वाचले आणि ऐकले असेल की, वाशिम जिल्ह्याची निवड ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी देशातील पाच विशेष जिल्ह्यांपैकी एका म्हणून करण्यात आली आहे. हा उपक्रम काय आहे? त्याचे उद्दिष्ट काय आहे? आणि वाशिम जिल्ह्यासाठी त्याचा नेमका कसा उपयोग होणार आहे? याबाबतची माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.       ऑपरेशन द्रोणागिरी हा केवळ नावीन्यपूर्ण उपक्रम नसून, तो आपल्या जिल्ह्याला प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवे ओळख निर्माण करून देणारा उपक्रम ठरणार आहे. या संदर्भात आपण ऑपरेशन द्रोणागिरीचा उद्देश, त्यामागील विचारधारा, तसेच वाशिम जिल्ह्याच्या विकासात होणारे योगदान या सर्वांवर सविस्तर चर्चा करू. वाशिम जिल्ह्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट म्हणजे, ऑपरेशन द्रोणागिरी या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) डिसेंबर 2022 मध्ये सुरू केलेल्या य...

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर

Image
पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर वाशिम,दि.२४ जानेवारी (जिमाका) राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. हसन मुश्रीफ दि.२५ जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव, दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ९.१० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथून पोलिस कवायत मैदानाकडे प्रयाण, ९.१५ ते १०.३० भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहण समारंभाला उपस्थिती, १०.३० वाजता वाशिम येथुन छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष..डाक विभागाची 'सुकन्या समृद्धी खाते' मोहीम जन्मु द्या त्या चिमुकलीला ..सार्थक या जन्माचे होईल पहाल तुम्ही, हिच चिमुरडी एक दिवस आकाशी भरारी घेईल

Image
राष्ट्रीय बालिका दिवस विशेष डाक विभागाची 'सुकन्या समृद्धी खाते' मोहीम   जन्मु द्या त्या चिमुकलीला ..सार्थक या जन्माचे होईल पहाल तुम्ही, हिच चिमुरडी एक दिवस आकाशी भरारी घेईल वाशिम,दि.२३ जानेवारी (जिमाका)  "समाजातील स्त्रियांना समान हक्क आणि संधी मिळाव्यात, त्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे, तसेच मुलींच्या शिक्षण आणि सशक्तीकरणाला चालना मिळावी, या उद्देशाने दरवर्षी २४ जानेवारीला 'राष्ट्रीय बालिका दिवस' साजरा केला जातो. २००८ साली सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाच्या वर्षीही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जात आहे." तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा १० वर्धापन दिन भारतीय डाक विभाग साजरा करत आहे.        पोस्टल विभाग मुलींचे भविष्य उज्वल, सक्षम करण्याची संधी देत आहे. व सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे जी केवळ मुलींसाठी आहे. "बेटी बचाओ बेटी पढाओ” चा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे.       ...

उत्कृष्ट आरोग्य सेवा ही जिल्ह्याची ओळख व्हावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"आरोग्य यंत्रणा राज्यात अव्वल – वाशिम जिल्हा रुग्णालयाचा गौरवशाली सन्मान"

Image
उत्कृष्ट आरोग्य सेवा ही जिल्ह्याची ओळख व्हावी      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "आरोग्य यंत्रणा राज्यात अव्वल – वाशिम जिल्हा रुग्णालयाचा गौरवशाली सन्मान" "जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कावरखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ठोंबरे यांच्या कामगिरीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव वाशिम,दि.१७ जानेवारी (जिमाका) जिल्हा रुग्णालयाने राज्यस्तरीय क्रमांक १ आणि आरोग्य यंत्रणेला क्रमांक २ मिळवून उत्कृष्ट सेवा कशा प्रकारे दिली जावी याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. हे यश केवळ आरोग्य यंत्रणेतील सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी अशाच प्रकारे समर्पित कार्य सुरू ठेवण्याची गरज आहे. यशस्वी कार्याबद्दल संपूर्ण आरोग्य विभागाचे अभिनंदन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिमच्यावतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या.      या कार्यक्रमास आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. संतोष स...

महा रेशीम अभियान: शेतकऱ्यांनसाठी सुवर्णसंधी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस..जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरव झेंड ..ीजिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान

Image
महा रेशीम अभियान: शेतकऱ्यांनसाठी सुवर्णसंधी     जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी जिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान वाशिम, दि. १७ जानेवारी (जिमाका):  "रेशीम शेती ही शाश्वत आणि फायदेशीर पर्याय आहे. महारेशीम अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे  उद्दिष्ट आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि रेशीम शेती व उद्योगाकडे वळावे.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.      रेशीम उद्योग हा कृषीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. त्याच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते आज दि.१७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखवून रेशीम जनजागृती रथ जिल्ह्यात मार्गस्थ करण्यात आला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार यांच्या...

आकांक्षित'चा ठपका पुसण्यासाठी एकजुटीने काम करुया खासदार संजय देशमुख

Image
'आकांक्षित'चा ठपका पुसण्यासाठी एकजुटीने काम करुया       खासदार संजय देशमुख प्रलंबित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न वाशिम,दि.१६ जानेवारी (जिमाका) जिल्ह्याचा आकांक्षितचा ठपका पुसण्यासाठी आपण सर्व मिळून काम करुया असे प्रतिपादन खासदार संजय देशमुख यांनी केले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी यंत्रणांना दिले. प्रलंबित विकासकामांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.        "जिल्ह्यात महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी अधिक प्रभावी आणि त्वरित कार्यवाही सुरू केली पाहिजे," असे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले.  जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक आज नियोजन भवन येथे खासदार श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या प्रगतीचा आ...

आणीबाणी ही देशासाठी काळी रात्र — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
*आणीबाणी ही देशासाठी काळी रात्र*       — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १६ : देशात लावण्यात आलेली आणीबाणी ही आपल्या देशासाठी काळी रात्र होती. त्यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान गुंडाळून ठेवले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस  माहिती होणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "इमर्जेन्सी" या चित्रपटाच्या विशेष शो दरम्यान केले. इमर्जेन्सी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.  माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या सर्वांसाठी महान आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की आणीबाणी हा एक असा क्षण आहे ज्यात प्रत्येक मनुष्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते. या लोकशाहीवर आलेल्या संकटाची माहिती जोपर्यंत देशाच्या नागरिकांना सांगणार नाही, तोपर्यंत त्यांना देशाची किंमत कळणार नाही, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केल...

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा चाचा नेहरू बालमहोत्सव जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

Image
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा चाचा नेहरू बालमहोत्सव       जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हाधिकाऱ्यांचे प्रेरणादायी आवाहन चाचा नेहरू बालमहोत्सवाचे थाटात उद्घाटन  वाशिम,दि.१६ जानेवारी (जिमाका) विद्यार्थ्यांना शैक्षणिक व कौशल्य विकासावर भर देऊन खेळांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने १५ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण संजय गणवीर, योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव , नागरीबाल विकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवर उपस्थित होते. सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. हे देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती केली जाईल. देशात सुरुवातीला ४७१ स्टार्टअप होते, आज ती संख्या १ लाख ५७ हजार आहे. महाराष्ट्र केवळ भारताच्या #स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्टअप आहेत – मुख्यमंत्री#startupindia #Startup

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.  यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवर उपस्थित होते. सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. हे देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती केली जाईल. देशात सुरुवातीला ४७१ स्टार्टअप होते, आज ती संख्या १ लाख ५७ हजार आहे. महाराष्ट्र केवळ भारताच्या #स्टार्टअप क्रांतीत ...

वाशिम जिल्ह्यात चियाची लागवड : शेतीच्या नव्या अध्यायाला सुरुवातचिया लागवडीत वाशिम जिल्हा अग्रेसर

Image
वाशिम जिल्ह्यात चियाची लागवड : शेतीच्या नव्या अध्यायाला सुरुवात चिया लागवडीत वाशिम जिल्हा अग्रेसर                 वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांपासून वेगळ्या आधुनिक पिकांकडे वळत आहेत. यामध्ये चिया हे पीक अल्पावधीतच शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चांगला दर मिळाल्यामुळे चियाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 608 हेक्टर क्षेत्रावर चियाचे उत्पादन घेतले जात आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ  शाह यांच्या नेतृत्वाखाली चियाची लागवड प्रोत्साहनासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.  चियाच्या लागवडीसाठी योग्य जमीन आणि काळाची निवड. कमी पाण्यात चांगले उत्पादन घेण्यासाठी पद्धती. सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्याचे फायदे.    तालुकानिहाय चियाची लागवड : मालेगाव 1 हजार 169 हेक्टर, रिसोड 972 हेक्टर, वाशिम 753 हेक्टर, मंगरूळपीर 598 हेक्टर, मानोरा 44 हेक्टर आणि कारंजा 72  हेक्टर करण्यात आली...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत "विहंग संस्कृती कला महोत्सव" चा सांगता समारोह संपन्न

Image
वृत्त क्र. दिनांक - 13 जानेवारी 2025 *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत "विहंग संस्कृती कला महोत्सव" चा सांगता समारोह संपन्न* *ठाणे,दि.१३(जिमाका):-* संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने ११ व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.      यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघुले, पूर्वेष सरनाईक, सुप्रसिद्ध गायक मिका सिंग उपस्थित होते.      मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावो, हीच सदिच्छा.     प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाई...

महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार* - *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**पुढील १०० दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा*

Image
*महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार*  - *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *पुढील १०० दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा*  मुंबई, दि. १३ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीप सारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र (Excellence Centres) स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.   या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.     मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वि...

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे* - *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

Image
*शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे*   - *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* मुंबई,दि.१३ – राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणा-या शासनाच्या महत्वकांक्षी *शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे* निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना आज येथे दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, श्रीमती मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव ए.दशपुते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापक अनिल गायकवाड यांच्या सह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी राज्यातील महामार्गाची उभारण...

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार**-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास*----*शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण*

Image
*शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार* *-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास* ---- *शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण* मुंबई, दि. ९ - राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर साकोरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल,...

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार**केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या*:*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा*

Image
*पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार* *केंद्र व  राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या*:*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा  मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा* मुंबई, दि.१३ :   पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास,  आणि सिंधुदुर्ग   (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूम शी जोडणार, केंद्र व राज्य  शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या. राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या 14 सेवा  आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री  इंद्रनील ...

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या**पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार**• एआय तंत्राचाही वापर**• नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर**- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

Image
*योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या* *पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार* *• एआय तंत्राचाही वापर* *• नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* मुंबई, दि. १३ : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.  राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.  प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण के...

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे पणन विभागाच्या १०० दिवसांचा घेतला आढावा मुंबई, दि. १३ - दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.     सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणारी कामाचा आढावा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.      समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारण्यात यावेत असे सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, समृध्दी महामार्गगा लगत उभारण्यात येणार ऍग्रो हब, मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभी करावीत. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ऍग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या.     पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या  सोयाबीन खरेदीसाठीची  तयारी ऑक्टोबरमध्ये पू...

नैसर्गिक शेतीकडे वाटचाल : जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी नवा मार्ग" ऍड निलेश हेलोंडेएरंडा नैसर्गिक खत व औषधी प्रशिक्षण केंद्राला भेट

Image
"नैसर्गिक शेतीकडे वाटचाल : जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी नवा मार्ग"             ऍड निलेश हेलोंडे एरंडा नैसर्गिक खत व औषधी प्रशिक्षण केंद्राला भेट वाशिम, दि.१० जानेवारी (जिमाका) नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक व टिकाऊ उत्पादन प्रणाली आहे जी रासायनिक खते व कीटकनाशकांवर अवलंबून न राहता निसर्गाच्या संतुलित प्रक्रियांवर आधारित असते. जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे, कारण यामुळे मृदाचे आरोग्य, पाणी व्यवस्थापन, पर्यावरणाचे संरक्षण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. जैवविविधता संवर्धनासोबतच हा दृष्टिकोन कृषी क्षेत्राला अधिक टिकाऊ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोलाचा ठरतो.असे प्रतिपादन   कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ऍड. निलेश हेलोंडे यांनी केले. दि.१० जानेवारी मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील नैसर्गिक खत व औषधी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली व संवाद साधून त्यांच्या...

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगले उत्पादन घ्यावे ऍड निलेश हेलोंडेचिया पिक म्हणजे कृषी विकासाचा नवा अध्यायचिया व संत्रा पिकाच्या प्रगतीची पाहणी

Image
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगले उत्पादन घ्यावे               ऍड निलेश हेलोंडे चिया पिक म्हणजे कृषी विकासाचा नवा अध्याय चिया व संत्रा पिकाच्या प्रगतीची पाहणी वाशिम,दि.१० जानेवारी (जिमाका)  शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगले उत्पादन घ्यावे. सरकारच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्याचे प्रयत्न करावेत.”असे प्रतिपादन  कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ऍड.निलेश हेलोंडे यांनी केले. आज दि.१० जानेवारी रोजी मालेगाव येथील प्रसिद्ध शेतकरी नीरज पांडे यांच्या शेताला भेट देऊन संत्रा व चिया पिकाच्या वाढीची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. संत्रा पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन व्यवस्थापन यासंबंधी त्यांनी सखोल निरीक्षण केले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, मालेगाव तालुका क‌षी अधिकारी कैलास देवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती निलेश ठोंबरे,कृषी पर्यवेक्षक धनंजय शितोळे आदी उपस्थित होते. शेतात आधुनिक शेत...

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा वर्ग ६ वी १८ जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील ३० केंद्रावर होणार परीक्षा विद्यार्थ्यांनो..! परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड केले का?

Image
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा वर्ग ६ वी   १८ जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील ३० केंद्रावर होणार परीक्षा  विद्यार्थ्यांनो..! परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड केले का? वाशिम,दि.६ जानेवारी (जिमाका) या परीक्षेकरीता ८ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेले आहेत. या परिक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन पध्दतीने काढण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रवेश पत्र काढण्यासाठी लिंक ला जावून  https://cbseitms.rcil.gov.in/ nvs/AdminCard/AdminCard  संकेत स्थळावरुन रजिस्ट्रेशन व विद्यार्थ्यांची जन्मतारीख टाकून काढता येईल. तसेच प्रवेश पत्र दोन प्रती मध्ये काढून त्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेवून एक प्रत परिक्षेच्या वेळी जमा करावी लागेल. तरी सर्व पालकांना, विद्यार्थ्याना व शिक्षकांना वरिल परिक्षेचे प्रवेश पत्र लवकरात लवकर ऑनलाईन पध्दतीने डाउनलोड करुन घ्यावेत असे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात यांनी सांगीतले.

३६ वे रस्ता सुरक्षा अभियान वाशिम शहरात हेल्मेट रॅलीचे आयोजन उत्साहात

Image
३६ वे रस्ता सुरक्षा अभियान वाशिम शहरात हेल्मेट रॅलीचे आयोजन उत्साहात वाशिम ,दि.६ जानेवारी (जिमाका) ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान दि. १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम कार्यालयातर्फे साजरा करण्यात येत आहे.       या अभियानाअंतर्गत परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा संदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी. याकरीता वेगवेगळे कार्यक्रम राबविले जात आहेत. मोटार सायकल वाहन चालकामध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी याकरीता दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महिला वर्ग, मोटार ड्रायव्हिंग स्कुल, पी.यु.सी. केंद्र, वाहन विक्रेते यांनी प्रत्यक्ष सहभाग घेवून शहारामध्ये मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्रामकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट,पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा संतोष शेळके यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात झाली. या रॅलीला पोलीस स्टेशन चौकातून आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय येथून उप प्...

चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन

Image
चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन       वाशिम, दि. ६ जानेवारी (जिमाका) : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन १५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत बालकांचा आनंद व्दिगुणित करण्याकरीता आणि बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरीता पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गजानन पडघान यांनी कळविले आहे.