निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने समन्वयाने काम करावे निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतला आढावा
निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने समन्वयाने काम करावे निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतला आढावा माध्यम कक्ष व नियंत्रण कक्षाला भेट वाशिम, दि.३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगामार्फत १४-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी प्रमोद वर्मा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून आज त्यांनी वाशिम जिल्ह्यातील खर्च विषयक कामांचा आढावा घेतला .यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, वाशिम मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके,अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्...