खरीप हंगामात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई
· खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा · शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासा · बोगस बियाणे, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा · पीक कर्ज वितरण उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य नियोजनाच्या सूचना वाशिम , दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने आगामी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे घरगुती बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कृषि विभागाने योग्य नियोजन करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आवश्यक पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सि...