पी.एम.विश्वकर्मा योजनेतून बलुतेदारांची कौशल्ये विकसित करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा अंमलबजावणी समिती सभा
पी.एम.विश्वकर्मा योजनेतून बलुतेदारांची कौशल्ये विकसित करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा अंमलबजावणी समिती सभा वाशिम दि. 14 (जिमाका) हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर व हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना आधार देऊन या बलुतेदारांची कौशल्ये पी.एम.विश्वकर्मा योजनेतून विकसित करण्यात यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह नुकताच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजनेचा आढावा जिल्हा अंमलबजावणी समितीच्या सभेत घेताना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.सभेला परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, एमएसएमईचे सहाय्यक संचालक श्री.डोईफोडे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विनोद मोहपात्रा, सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र पडघान,जिल्हा उद्योग केंद्राचे पर्यवेक...