Posts

लेखा व कोषागारे विभागीय क्रीडा स्पर्धेत वाशिम जिल्हा सर्वसाधारण विजेता

Image
लेखा व कोषागारे विभागीय क्रीडा स्पर्धेत वाशिम जिल्हा सर्वसाधारण विजेता   वाशिम, दि. 10 (जिमाका) :  लेखा व कोषागारे संचालनालयाअंतर्गत यवतमाळ येथे 7 व 8 जानेवारी दरम्यान अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2022-23 आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. वाशिम जिल्हा संघाने विविध खेळ प्रकारात सहभागी होऊन विभागातील इतर जिल्ह्यातील संघापेक्षा उत्कृष्ट कामगि‍री करीत एकूण 15 क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व 5 क्रीडा प्रकारामध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला. जिल्ह्याला एकूण 29 पदकांसह अमरावती विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.         जिल्हा संघातील विविध खेळ प्रकारानुसार खेळाडुंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन जिल्ह्याला सर्वसाधारण विजेता होण्याचा मान प्राप्त करुन दिला. विशेषता यामध्ये महिला खेळाडुंनी उल्लेखनीय कामगीरी केली. जिल्ह्याच्या महिला खेळाडुंनी एकुण 11 क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व 3 क्रीडा प्रकारात व्द‍ितीय क्रमांक मिळवून एकुण 20 पदके जिंकली.        ...

स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही विलास सारसकर ग्रंथालये,स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद “मी वाचन संस्कृती बोलतेय” एक पात्री नाटीकेने वेधले लक्ष !

Image
स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही                           विलास सारसकर  ग्रंथालये,स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद    “मी वाचन संस्कृती बोलतेय” एक पात्री नाटीकेने वेधले लक्ष !         वाशिम,दि.०७ (जिमाका) सध्या जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे. सारं जग स्पर्धेने एकमेकांसोबत चाललेले आहे.प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे.जणु स्पर्धा परीक्षा हाच त्यांचा जीवनाचा मार्ग आहे की काय असे वाटायला लागले आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार ठरणार नाही.कारण स्पर्धा केल्याशिवाय यश देखील मिळणार नाही.परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजीक हिताचा देखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन मानले पाहिजे. असे तरूणमनावर बिंबविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.असे प्रतिपादन विक्रीकर अधिकारी विलास सारसकर यांनी केले.   ...

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

Image
*बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* मुंबई, दि. ६ : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्युज नेटवर्क ने आयोजित केलेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रंजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारा...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापना

Image
पदवीधर मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापना        वाशिम, दि. 06 (जिमाका)  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ अमरावती विभाग निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमानूसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान आणि 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील नैसर्गिक आपत्ती कक्षात स्थापन करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष नायब तहसिलदार तथा आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष नियंत्रण अधिकारी कैलास देवळे यांच्‍या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. या कक्षातील दूरध्वनी क्रमांक 07252-234238 आणि भ्रमणध्वनी क्रमांक 8379929415 हा आहे. आचारसंहितेबाबत तक्रारी/मार्गदर्शनासाठी उमेदवार, राजकीय पक्ष व मतदार यांना काही अडचणी असल्यास तसेच आचारसंहितेबाबतच्या तक्रारी असल्यास या क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी कळविले आहे.  *******

जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Image
जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन        वाशिम, दि. 06 (जिमाका)  : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी नियतकालीक सुरु केले. हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालय येथे बाळशास्त्री जांभेकर यांना आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांनी पुष्पहार अर्पण केला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, जिल्हा माहिती कार्यालयाचे राजू जाधव, विजय राठोड, गजानन डहाके व अनिल कुरकुटे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थितांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिली. *******