Posts

‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचनांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Image
  वाशिम ,   दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यात १ ऑक्टोंबर २०२० पासून लॉकडाऊनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या २९ डिसेंबर २०२० च्या आदेशानुसार सदर मार्गदर्शक सूचना आता ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केले आहेत.   या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० ,  भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Image
  वाशिम ,   दि. ०१ (जिमाका) : कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘ एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा असून अर्ज सादर करण्यासाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ असून या संकेतस्थळावरील ‘ शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल , संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट , सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी ), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून ‘महा-डीबीटी’च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. ‘ वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक ...

मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० वाशिम ,   दि. ३१ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होत आहे. तसेच १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर १४ जानेवारी २०२१ रोजीचे सकाळी ६ वाजेपासून ते १५ जानेवारी २०२१ रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती वाशिम तालुका (२४) : - कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, वारा जहांगीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पार्डी टकमोर, तोंडगाव, भोयता, ...

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

Image
  वाशिम ,   दि. ३० (जिमाका) : जिल्हा क्रीडा पुरस्काराच्या २४ जानेवारी २०२० रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार २६ जानेवारी २०२१ रोजी वितरीत करण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये वाशिम जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (१ पुरुष, १ महील व १ दिव्यांग), १ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार असे एकूण चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, हा या क्रीडा पुरस्कारांचा उद्देश आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कारासाठी शासन निर्णयातील पात्रतेच्या निकषानुसार व पुरस्कार वर्ष १ जुलै ते ३० जून असे राहील. या कालावधीतील क्रीडा विषयक कामगिरीचा आढावा घेण्यात येईल. शासन निर्णयातील परिशिष्ट अ-६.१ अन्वये जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी खेळाचा समावेश असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्र...

मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर

Image
  वाशिम ,   दि. ३० (जिमाका) :   जिल्ह्यातील मोटार वाहन चालक ,   मालक यांच्या सोयीसाठी   उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन कर वसुली ,   मोटार वाहन नोंदणी ,   तपासणी ,   वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात येते. त्यानुसार जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत होणाऱ्या मासिक शिबिरांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कारंजा येथे ५ व २१ जानेवारी, ३ व २३ फेब्रुवारी, ३ व २३ मार्च, ६ व २२ एप्रिल, ४ व २० मे आणि ४ व २२ जून रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिसोड येथे ८ जानेवारी, ९ फेब्रुवारी, ९ मार्च, ९ एप्रिल, ७ मे व ८ जून रोजी, मानोरा येथे १३ जानेवारी, १२ फेब्रुवारी, १५ मार्च, १५ एप्रिल, ११ मे व १४ जून रोजी, मंगरूळपीर येथे १८ जानेवारी, १६ फेब्रुवारी, १८ मार्च, १९ एप्रिल, १७ मे व १८ जून रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. मासिक शिबिराच्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्यास शिबीर दुसऱ्या कार्यालयीन दिवशी घेण्यात येईल. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्...