Posts

बाकलीवाल विद्यालयात विधी साक्षरता अभियान

Image
·         विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन वाशिम , दि . १६ :   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ ऑक्टोंबर रोजी बाकलीवाल विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता विधी साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५ ऑक्टोंबर रोजी विधी प्रदर्शनी व १६ ऑक्टोंबर रोजी विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांनी विद्यार्थ्यांना माता, पिता व शिक्षक यांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच कायद्याचे ज्ञान असणे का आवश्यक आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अॅड. गितांजली गवळी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, सोशल मिडिया आणि कायदा याविषयी मार्गदर्शन केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखाधिकारी राजन गंडागुळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याच्या अभ्यासाचे महत्व समजावून सांगितले. जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया यांनी विद्यार्थ्यांना कायदे...

‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण

Image
वाशिम , दि . १६ :   नाबार्डच्यावतीने बचत गटातील महिला सदस्यांसाठी १२ ऑक्टोंबर २०१८ रोजी भारतीय स्टेट बँक- ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था येथे एक दिवशीय नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बँकेच्या वाशिम शाखेचे मुख्य व्यवस्थापक स्वप्नील देशमुख होते. यावेळी आरसेटीचे संचालक रघुनाथ निपाने , ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे , महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या वाशिम शाखेचे शाखा व्यवस्थापक आशुतोष कुमार , बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री. मालोकार, युको बँकेचे शाखा व्यवस्थापक अशोक कुमार, आयडीबीआयचे शाखा व्यवस्थापक उदय बुरवे, आरसेटीचे आशिष राऊत यांच्यासह वाशिम तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या सुमारे ६६ महिला सदस्य उपस्थित होत्या. यावेळी श्री.   खंडरे यांनी महिला बचत गटांना बँकेसंबंधी येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यावर उपाय याबद्दल मार्गदर्शन करून महिलांनी खर्च व बचत यांचा मेळ कसा घालावा, त्याचबरोबर महिलांनी सुद्धा डिजिटल व्यवहारांची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी...

आपत्ती व्यवस्थापनसंबंधी निबंध, चित्रकला स्पर्धा उत्साहात

Image
वाशिम , दि . १६ :   संयुक्त राष्ट्राने घोषित केल्यानुसार जिल्हास्तरावर ११ ते १८ ऑक्टोंबर दरम्यान आपत्ती निवारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत शुक्रवार, १२ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ ते १.३० वा. दरम्यान नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये माझे योगदान या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ७ वी ते १० वीच्या वर्गातील तसेच ११ वी ते १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी २५० शब्द मर्यादेत निबंध स्पर्धा घेण्यात आली. दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान ‘नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती व त्याचे परिणाम या विषयावर ७ वी ते १२ वीमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक अधीक्षक मीरा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मात्रे, प्रताप काळे, अनिल पडघान, गजानन कांबळे, सुवर...

स्काऊट गाईड नोंदणीमध्ये वाशिम जिल्हा अमरावती विभागात प्रथम

Image
वाशिम , दि . १६ :   महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस राज्य कार्यालयाच्या निकषानुसार सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सर्वात जास्त युनिट नोंदणी सदस्य संख्येसाठी वाशिम भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाला अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळाला. नुकतेच मुंबई येथे झालेल्या पारीतोषिक वितरण सोहळ्यात राज्य अध्यक्ष ज्ञानबा मुंडे व राज्य माजी मुख्य आयुक्त भा. ई. नगराळे यांच्या हस्ते अमरावती विभागाचे सहाय्यक राज्य आयुक्त गाईड रजनीताई धानोरकर, सहाय्यक राज्य आयुक्त स्काऊट रमेश चांदुरकर, जिल्हा आयुक्त स्काऊट एस. आर. पुंड व राज्य मंडळ सदस्य बबन आघाव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात हा बहुमान स्वीकारला. वाशिम भारत स्काऊटस आणि गाईडसच्या या यशाबद्दल जिल्हा कार्यालयाचे अध्यक्ष आमदार अमित झनक, उपाध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक, गणेश काळे, विठ्ठलराव पाटील, जुगलकिशोर कोठारी, वेणूताई गोटे, जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी ए. एस. आहाळे, जिल्हा आयुक्त गाईड अलका रावसाहेब, जिल्हा चिटणीस मंगेश धानोरकर, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब गोटे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्...

मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·         जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा ·         महाराष्ट्र हरित सेनेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या ·         पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदाविषयी जनजागृती करा वाशिम , दि . १६ : मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक असून याकरिता संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातून या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. नियोजन भवन येथे १६ ऑक्टोंबर रोजी आयोजित जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, उप प्रादेशिक परि...