Posts

‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’मुळे मिळणार शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·          जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद ·          महाराष्ट्र समृद्धी महामार्गाविषयी सादरीकरण ·          विकास कामांमध्ये भागीदारीमुळे होणार फायदा ·          युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार वाशिम , दि . २६ :   महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (सुपर कम्युनिकेशन हाय-वे) निर्मितीसाठी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ ने शेतकऱ्यांनी आपली जमीन उपलब्ध करून दिल्यास त्यांना भूसंपादनाच्या इतर पद्धतींपेक्षा सर्वाधिक मोबदला मिळणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची सोय होणार असून शेतकऱ्यांसाठी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते.  याप्रसंगी भूसंपादन अधिकारी अनि...

वाशिमकरांनी घेतली सामाजिक ऐक्याची प्रतिज्ञा

Image
·         ‘सदभावना दिना’निमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम ·         सदभावना रॅलीत विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाशिम , दि . २० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २० ऑगस्ट हा दिवस सदभावना दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथून सदभावना रॅलीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी सर्व उपस्थितांनी सदभावना दिनानिमित्त सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डी. एच. जुमनाखे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ए. डी. मानक...

सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

Image
     तोंडगाव येथील शेततळ्यामध्ये जलपूजन वाशिम , दि . १५ :   राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे विकेंद्रित जलसाठे निर्माण होत आहेत. यामधील पाण्याचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याच्या बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमधून वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे तयार करण्यात आलेल्या तळ्यामध्ये जलपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार बळवंत अरखराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर आदी उपस्थित होते. ना. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे....

‘सायबर लॅब’मुळे गुन्ह्यांचा तपास गतीने होणार - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

Image
वाशिम , दि . १५ :   सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाराष्ट्र सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक सायबर लॅबची निर्मिती करण्यात आली असून या लॅबमुळे गुन्ह्यांचा तपास गतीने करून गुन्हेगारांवर वचक बसविता येणार असल्याचे प्रतिपादन असल्याचे राज्याच्या बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण केले. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. हर्षदा देशमुख, वाशिम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमच्या नगराध्यक्ष सौ. लताताई उलेमाले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. ना. चव्हाण म्हणाले की, आज गुन्हेगारांकडून इंटरनेट व अद्ययावत तंत्रज्ञानाचा व...