आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम : जिल्ह्यात संपूर्णता अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम :
जिल्ह्यात संपूर्णता अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
वाशिम, दि.५ जुलै (जिमाका)
नीती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्हा आणि मालेगाव तालुका यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शिक्षण, पोषण आहार आणि सामाजिक विकास याबाबतीत जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. तसेच उर्वरित गरोदर मातांचे १२ आठवड्यात नोंदणी करणे आणि माती परीक्षण पत्रिका वितरण करणे हे दोन उद्दिष्टे येत्या तीन महिन्यात शंभर टक्के साध्य करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात निती आयोगामार्फत संपूर्णता अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी केले. यावेळी नीती आयोगाचे डेटा एनलायझर हर्षद सिंग तसेच जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह,आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागामार्फत मृदा परीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने ९३% उद्दिष्ट साध्य केले आहे. तरी येत्या तीन महिन्यात आयोगाने केलेल्या सूचनेनुसार हे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यात येतील तसेच आरोग्य विभागांतर्गत असलेल्या गरोदर महिलांच्या १२ आठवड्यातील नोंदणीलाही शंभर टक्के करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे याबाबत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, बऱ्याच महिला स्थलांतरण तसेच माहेरी जातात किंवा इतर ठिकाणी जात असल्याने त्यांची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील संपूर्णता अभियान या सेल्फी पॉइंट ला भेट देऊन जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेल्फीही काढल्या.
निती आयोगाने ४ जुलै रोजी ५०० आकांक्षीत तालुके ब्लॉक आणि ११२ आकांक्षीत जिल्ह्यातील १२ प्रमुख सामाजिक क्षेत्र निर्देशकांमध्ये संपूर्णतः प्राप्त करण्याच्या उद्देशाने संपूर्णता अभियान नावाची देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. आरोग्य, पोषण, कृषी, सामाजिक विकास आणि शिक्षण या विषयांवर लक्ष केंद्रित करणारी ही व्यापक तीन महिन्यांची मोहीम यावर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी मालेगाव तालुक्यातील एकांबा येथील कृषी सहाय्यकांना गावकऱ्यांसाठी १०० मृदा परीक्षण पत्रिका ही वितरित केले.
Comments
Post a Comment