लाभार्थ्यांनो ! बॅंक खात्याशी आधारकार्ड जोडुन घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


लाभार्थ्यांनो ! बॅंक खात्याशी आधारकार्ड जोडुन घ्या
 
      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

वाशिम,दि.१ जुलै (जिमाका) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने जर बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसेल तर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करता येणार नसलेबाबत शासनाकडुन सुचित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार
योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे महाडीबीटी प्रणालीव्दारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्यानुषंगाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनेतील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप