शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागास सूचना
शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागास सूचना वाशिम, दि. ३० (जिमाका) : जिल्हयात खरीप हंगामात विविध पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते योग्यवेळी उपलब्ध करुन देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षताघ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले. खरीप हंगाम २०२४ पुर्वतयारी आढावा बैठक २९ एप्रिल रोजी वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. सभेकरीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह जिल्हयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सभेमध्ये माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी केले. खरीप हंगाम २०२४ ची पुर्वतयारी म्हणुन ४ लाख ५ हजार १८० हेक्टरवर...