पदवीधर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
वाशिम , दि . २२ : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सुचना प्रसिद्ध करून या कार्यक्रमास प्रारंभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध होईल. दिनांक १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. त्यानंतर दिनांक २५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची द्विव्तीय पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत नमुना १८ द्वारे दावे व हरकती स्वीकारल्या जातील. दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार यादीची छपाई करण्यात येईल. दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याविषयी दावे व हरकती दिनांक २३ नोव्हेंबर ते ०८ डिसेंबर २०१६ या कालावधीत स्वीकारल्या जातील. दावे व हरकती निकाली काढून दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी पर्यंत पुरवणी यादी तयार करून छपाई करण्यात येईल. दिनांक ३० डिसें...