जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांची नेतंसा येथील योगऋषी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट पारंपरिक जैविक निविष्ठांची केली पाहणी
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांची नेतंसा येथील योगऋषी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट पारंपरिक जैविक निविष्ठांची केली पाहणी वाशिम दि.19(जिमाका) डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत स्थापन केलेल्या रिसोड तालुक्यातील नेतंसा येथील योगऋषी शेतकरी उत्पादक कंपनीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी 18 ऑगस्ट रोजी भेट देऊन राज्यातील पहिल्या परंपरागत जैविक निविष्ठा केंद्राची पाहणी केली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे,तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटीत कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या या पहिल्या माती केंद्रावर (परंपरागत जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र) शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या ४० जैविक निविष्ठा व त्याची उपयुक्तता याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा आणि कंपनीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. ...