भविष्यातील शाश्वत शेतीसाठी जननद्रव्यांचे जतन व पुनर्वापर गरजेचे - डॉ.ग्यानेंद्रप्रताप सिंग ज्वारीसह इतर तृणधान्य पिकात यांत्रिकीकरणासह मूल्यवर्धन काळाची गरज - डॉ शरद गडाख ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम
भविष्यातील शाश्वत शेतीसाठी जननद्रव्यांचे जतन व पुनर्वापर गरजेचे - डॉ.ग्यानेंद्रप्रताप सिंग ज्वारीसह इतर तृणधान्य पिकात यांत्रिकीकरणासह मूल्यवर्धन काळाची गरज - डॉ शरद गडाख ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम वाशिम दि.14(जिमाका) बदलत्या जागतिक परिस्थितीत भारतीय शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होण्यासाठी देशभरातील शेती संशोधक वर्ष गणिक मेहनत करीत आहे.पिकाच्या अधिक उत्पादनासाठी जननद्रव्यांचे जतन तसेच काल सुसंगत पुनर्वापर गरजेचा आहे.असे प्रतिपादन राष्ट्रीय पादप आनुवंशिक संशोधन ब्युरो,नवी दिल्लीचे निदेशक डॉ.ग्यानेंद्रप्रताप सिंग यांनी केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,राष्ट्रीय पादप आनुवंशिक संशोधन ब्युरो,नवी दिल्ली आणि राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था,हैदराबाद यांचे संयुक्त वतीने कृषी संशोधन केंद्र,वाशिम येथे 13 मार्च रोजी आयोजित " ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस " कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ग्यानेंद्रप्रताप बोलत होते.या कार्यक्रमाला देशभरातून उपस्थित तृणधान्य वर्गीय पिका...