Posts

लोकांच्या मनात घर करण्याची संधी: सीईओ वसुमना पंत

Image
लोकांच्या मनात घर करण्याची संधी:  सीईओ  वसुमना पंत अमृत महा आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न   वाशिम, दि. 8 डिसेंबर ग्रामिण भागातील बेघर आणि गरीब कुटुंबांना शासनाच्या योजनेमधुन घरकुल बांधुन देण्याच्या कामाची महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी ऐवजी ही एक मोठी संधी मिळाली असे समजुन काम केल्यास लोकांचे घरकुल तर होईलच पण त्यांच्या मनात कायम घर करुन रहाल अशा शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अमृत महा आवास अभियान 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्यांनी आपले विचार व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या म. फुले सभागृहात (दि. ६ ) संपन्न झालेल्या एक दिवशीय कार्यशाळेला जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगांबर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत “अमृत महा आवास अभियान 2022-23” राबविण्यात येत आहे ...

शांताबाई गोटे महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर व चर्चासत्र संपन्न

Image
शांताबाई गोटे महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर व चर्चासत्र संपन्न        वाशिम, दि. 07 (जिमाका) :  २६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन करण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिमेव्दारे मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या वतीने मोहिमेचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविण्यात आले. याच मोहिमेचा एक विशेष भाग म्हणून ३ डिसेंबर रोजी मातोश्री शांताबाई गोटे कनिष्ठ महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.             या शिबीरात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, विधी अधिकारी अॅड. किरण राऊत व श्री. गोपाल गणोद यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले. संशोधन सहाय्यक मोहन तिडके यांनी पीटीटीद्वारे सादरीकरण केले. शिबीर व चर्चासत्र...

सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ

Image
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ वाशिम, दि. 07 (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ आज 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना सशस्त्र सेना ध्वज लावून करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक नरेंद्र वाघमारे यांनी श्री. हिंगे यांना सशस्त्र सेना ध्वज लावला. स्वातंत्र्याची अमर ज्योत सतत तेवत ठेऊन मातृभूमिचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य देशाच्या शूर सैनिकांचे आहे. युध्द अथवा युध्दजन्य परिस्थीतीत तसेच अतिरेकी कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या भारतीय लष्करातील पराक्रमशील जवानांच्या बलिदानाची नागरीकांना कायम आठवण राहावी, यासाठी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. भारतीय शूर सैनिकांच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी त्यांच्या कुटूंबियांचे/ अवलंबितांचे पुनर्वसन करण्यास ध्वजदिन निधी संकलनातून मदत करण्यात येते. सैनिकांच्या कुटूंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याकरीता लागणारा खर्च सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त...

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसीस सेंटर रुग्णांच्या सेवेत

Image
जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसीस सेंटर रुग्णांच्या सेवेत       वाशिम, दि. 06 (जिमाका) :  वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक 10 बेडेड डायलिसीस सेंटर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून रुग्णांच्या सेवेत कार्यान्वयीत करण्यात आले आहे. एका किडनी रुग्णाच्या हस्ते फित कापून डायलिसीस सेंटर सुरु करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, किडनी रोगतज्ञ डॉ. पंकज गोटे, डॉ. मोरे, डॉ. पवार व परिचारीका श्रीमती कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.            डायलिसीस सेंटरचे वैशिष्टय म्हणजे हे सेंटर पुर्णत: वातानुकूलित व सेंट्रल मॉनिटरींगसहित आहे. यामध्ये एचआयव्ही आणि हिपॅटायटिस- बी व सी बाधीत रुग्णांना देखील डायलिसीसची सुविधा उपलब्ध असून 2 हजार लिटर प्रतितास क्षमतेचा अद्यावत आर ओ प्लँट आहे. अमरावती व बुलडाणानंतर वाशिम येथे हे सर्वात मोठे अत्याधुनिक डायलिसीस सुविधेचे सेंटर सुरु झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हयातील किडनीच्या रु...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी सामाजिक न्याय पर्वाचा समारोप

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी सामाजिक न्याय पर्वाचा समारोप       वाशिम, दि. 06 (जिमाका) :  26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दरम्यान सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात आले. सामाजिक न्याय पर्वाचा समारोपीय कार्यक्रम आज 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, ॲड. अभिमन्यू नवघरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ व प्राचार्य यु.एस. जमदाडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करुन अभिवादन केले.           ॲड. नवघरे यांनी आपल्या मार्गदर्शनात दिव्यांग व्यक्तीचे अधिकार व नालसा योजना 2016 ...