Posts

वनोजा येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न

Image
वनोजा येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न वाशिम दि.२१(जिमाका) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमच्या वतीने आज २१ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणेच्या वतीने एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.गावंडे होते.मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक राजेश यावले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,सहायक पोलीस निरीक्षक श्री कमलसिंह निनामा,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सहदेव डोंगरे व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी उपस्थित होते.या प्रशिक्षणाला कार्यक्रमाला मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी,प्राध्यापक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

आदिवासी मुलांचे वसतीगृहात बिरसा मुंडा जयंती साजरी

Image
आदिवासी मुलांचे वसतीगृहात बिरसा मुंडा जयंती साजरी वाशिम, दि. 18 (जिमाका) :  नवीन आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहात 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. गजेंद्र सरपाते, प्रा. जुनघरे, आदिवासी वसतीगृहाचे प्रमुख एस.एस. वानखडे व एस.जी. घोलप यांची उपस्थिती होती. श्री. सरपाते यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या भौतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व भावनिक समस्येवर उपाययोजना व त्यांचे निराकरण याविषयी माहिती दिली. स्वत:चे ध्येय निश्चित करुन पुढील वाटचाल करण्याविषयी काय करावे हे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. श्री. जुनघरे यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:च आपल्या जीवनाचा शिल्पकार व्हावे, समस्येवर मात करुन विद्यार्थ्यांनी पुढे जायला पाहिजे. याकरीता त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा आदर्श लक्षात ठेवावा व स्वत:मध्ये बदल करावा असे सांगितले. यावेळी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून गृहपाल एस.एस. वानखडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. संचालन विनोद...

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेमध्ये यश

Image
शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेमध्ये यश वाशिम, दि. 18 (जिमाका) :  आयइडीएसएसए अंतर्गत अमरावती विभाग एच-झोनमधील सर्व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता खोखो, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस व ॲथलेटिक्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शासकीय तंत्र निकेतन वाशिम येथील विद्यार्थ्यांना खेळामध्ये आवड निर्माण होऊन खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविण्याकरीता संस्थेच्या उपलब्ध असलेल्या क्रीडांगणावर विद्यार्थी सराव करतात. अकोला येथील मानव पॉलिटेक्निक येथे नुकत्याच झालेल्या खोखो स्पर्धेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन वाशिमच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळविले. यामध्ये अतुल शिंदे, पार्थ चोपडे, वेदांत बगाडे, हनुमान शिंदे, ओम ढोरे, ओम कौलकर, विशाल टाकरस, शिवहरी नेमाडे, पवन कंडारे, सारंग शिंदे, विजय दुगाने, हर्षल तपसी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महिलांच्या सामन्यामध्ये यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे झालेल्या थाळीफेक स्पर्धेमध्ये वैष्णवी निमकर व लांबउडीमध्ये आकांक्षा वानखेडे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. यामध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय ...

तुळशिराम जाधव महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Image
तुळशिराम जाधव महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वाशिम, दि. 18 (जिमाका) :  जात वैधता प्रमाणपत्र देण्याची विशेष मोहिम मंडणगड पॅटर्ननुसार राबविण्यात येत आहे. ही मोहिम जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी एल.बी. राऊत, समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ हे जात वैधता प्रमाणपत्र कार्यपध्दती, मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यशाळा घेत आहे. याचाच एक भाग म्हणून आज 18 नोव्हेंबर रोजी वाशिमजवळील लाखाळा येथील तुळशिराम जाधव कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जोशी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत, उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. तायडे उपस्थित होते. डॉ. श्रीमती कुलाल यांनी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्या...

जिल्ह्यात " मंडणगढ पॅटर्न " नुसार मिळणार जात वैधता प्रमाणपत्र मोहिमेच्या नियोजनाबाबत बैठक

Image
जिल्ह्यात " मंडणगढ पॅटर्न " नुसार मिळणार जात वैधता प्रमाणपत्र मोहिमेच्या नियोजनाबाबत बैठक वाशिम,दि.१६ (जिमाका) समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून राज्यात जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिम मंडणगड पॅटर्ननुसार राबविण्यात येत आहे.          या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ.छाया कुलाल व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांच्या उपस्थितीत मंडणगड पॅटर्न प्रभावीपणे राबविण्यासठी जिल्हा प्रकल्प अधिकारी व समतादुत यांची आज १६ नोव्हेंबर  रोजी बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला जिल्हा प्रकल्प अधिकारी व  समतादुत,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          बैठकीमध्ये  डॉ.छाया कुलाल यांनी मंडणगड पॅटर्न अंतर्गत कामकाजाचे नियोजन करून सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्राचा ११ वी, १२ वी विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्या...