सामाजिक समता कार्यक्रमविकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आ. अॅड. किरणराव सरनाईक
सामाजिक समता कार्यक्रम विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आ. अॅड. किरणराव सरनाईक वाशिम, दि.१४ (जिमाका) वाशिम हा आकांक्षीत जिल्हा आहे. सर्वांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली पाहिजे.समाज कल्याण विभागाच्या कोणत्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल याचा अभ्यास करून त्या योजनेचा लाभ घ्यावा.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शिक्षण घेतले शिक्षण हा मूलभूत कायदा आहे. विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे.असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांनी केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत आज १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दलच्या व्याख्यानाचे उद्घाटक म्हणून अॅड. सरनाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत हे होते.प्रमुख अतिथी म्हणून...