Posts

बेरोजगार युवक-युवतींच्या मदतीसाठी मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्ष - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या ‘ गुगल फॉर्म ’ आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल , असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘ गुगल फॉर्म ’ आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , आमदार राजेंद्र पाटणी , आमदार अमित झनक , जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले , लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींचा रोजगार व स्वयं...

पालकमंत्र्यांच्या हस्ते भित्तीपत्रकांचे प्रकाशन

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) :  जिल्ह्यातील नागरिकांना व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात तयार केलेल्या विविध भित्तीपत्रकांचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज, २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत.या योजनांची माहिती नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.अशा काही योजनांची भिंतीपत्रकांच्या माध्यमातून गावोगावी प्रसिद्धी व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात योजनांवर आधारित सचित्र माहिती अस...

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘योजना’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) : शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी व त्यामाध्यमातून त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून तयार केलेल्या ‘योजना’ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज, २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘योजना’ नावाच्या घडीपुस्तिकेमध्ये माझी कन्या भाग्यश्री, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मनोधैर्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना आर्थिक सहाय्य योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, मच्छिमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, गोपीनाथ मुंडे शे...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) : गृह (ग्रामीण) , वित्त , नियोजन , राज्य उत्पादन शुल्क , कौशल्य विकास व उद्योजकता , पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज, २९ जून रोजी चिखली रोड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. *****

‘कोरोना’ संसर्ग रोखण्याबाबत दक्षता बाळगा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

Image
·          कोरोना संसर्ग, खरीप हंगाम विषयक बाबींचा आढावा ·          गरोदर महिला, वयोवृद्ध यांची विशेष काळजी घ्या ·          स्थलांतरित नागरिकांची आरोग्य तपासणी आवश्यक वाशिम ,   दि. १८ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी रेड झोनमधून जिल्ह्यात परतलेले सर्व नागरिक, जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रासह इतर भागातील नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग रोखाण्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १८ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार...