जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना ३१ मार्चपर्यंत राहणार बंद
· कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश · जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना गर्दी टाळा, साठा करू नका वाशिम , दि. २१ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या गर्दीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे किराणा, धान्य, दुध व दुग्धोत्पादन दुकाने, फळे-भाजीपाला दुकाने, मेडिकल, दवाखाने व पेट्रोलपंप या जीवनावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने व आस्थापना २१ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या कोव्हीड-१९ या आजाराने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ मार्च २०२० पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तर...