शेतकऱ्यांना मागणीनुसार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
• ‘आत्मा’ नियामक मंडळाची आढावा सभा • सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वाशिम, दि. ३१ : शेतकरी गटामध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तसेच त्यांच्या मागणीनुसार त्यांना प्रशिक्षण, अभ्यास दौरा, प्रात्यक्षिक व शेतीशाळा आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हाउपनिबंधक रमेश कटके, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, अशासकीय सदस्य गोपाळराव लुंगे, विठ्ठलराव आरु आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा ...