बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्याला दहा हजार रुपयेपर्यंतच्या तातडीच्या कर्जाचे वाटप करावे - किशोर तिवारी
· जिल्हधिकारी कार्यालयात आढावा बैठक · कर्ज वाटपाबाबतचा फलक प्रत्येक बँकेत लावा · प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी रविवारीही बँक सुरु राहणार वाशिम , दि . २८ : राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांपर्यंतचे तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सर्व बँकांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांकडून सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ देण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी तथा प्र...