शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवा - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर
· उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान कार्यशाळेचा समारोप वाशिम , दि. १५ : शेतकऱ्यांचे उत्पन्न त्याच्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट करण्यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाविषयक कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक एस. आर. सरदार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले आदी उपस्थित होते. ना. फुंडकर म्हणाले की, तोट्यामध्ये असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी कृषी विभागाने उन्न...