Posts

‘कोविडने काय शिकवले आणि काय करावे’ या विषयवार रविवारी मोफत वेबीनारचे आयोजन

  वाशिम ,   दि. २८ (जिमाका) :   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी ‘कोविडने काय शिकवले आणि काय करावे’ या विषयावर रविवार, ३० मे रोजी सकाळी ११ ते १२ वा. दरम्यान मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मनोचिकित्सक डॉ. शीतल देशमुख या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक युवक, युवतींनी ‘झूम’ अॅपद्वारे या वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. वेबीनारमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी ‘झूम’ अॅपद्वारे https://us04web.zoom.us/j/7706739074?pwd=bxRmOWowUk1tRCtRNXcrZ1IPaHQzQT09 या लिंकद्वारे किंवा मिटिंग आयडी : ७७० ६७३ ९०७४ आणि पासकोड : एचपी@१२३ वापरून सत्रात सहभागी होता येईल. यामध्ये काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४, ९७६४७९४०३७, ९६६५५२५६५१, ८१०८८६८४०३ या क्रमांकावर संपर्क साधून लिंक प्राप्त करून घ्यावी. आपल्याकडे झूम ॲप यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इंस्टॉल करुन घ्यावे. आपण झूम ॲपम...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
  ·         जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक वाशिम ,   दि. २७ (जिमाका) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या १८ वर्षाच्या आतील बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करावी. जेणेकरून अशा बालकांची काळजी घेण्यासाठी घेण्यासोबतच त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे, योग्य प्रकारे संगोपन करण्याची कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी सांगितले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गठीत जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २७ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी , सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड , जिल्हा नगर पालीका प्रशासन अधिकारी दिपक मोरे , जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे , जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे , प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले , समितीचे ...

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

  ·        ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन वाशिम ,   दि. २७ (जिमाका) : आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर , मेडीकल , नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘ मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ’ राबविण्यात येणार असून हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक युवक , युवतींनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी , असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजक मार्गदर्शन  केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. ]कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ‘ मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ’ वैद्यकीय क्षेत्राशी संलग्नित प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळून ते खाजगी अथवा सरकारी इस्पितळात काम ...

वाशिम जिल्ह्यात आणखी ३४७ कोरोना बाधित; ३१२ जणांना डिस्चार्ज

# कोरोना _ अलर्ट ( दि. २७ मे २०२१, सायं. ५ वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ३४७ कोरोना बाधित; ३१२ जणांना डिस्चार्ज   वाशिम : बालाजी मार्केट जवळ- १, सिव्हील लाईन्स- २, गव्हाणकर नगर- १, आययुडीपी कॉलनी- १, लोनसुने चौक- १, नालंदा नगर- १, पुसद नाका- १, सुंदरवाटिका- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, अडोळी- १, अनसिंग- ३, देवठाणा- १, धुमका- १, एकांबा- १८, घोटा- १, जांभरुण जहांगीर- १, काजळंबा- १, किनखेडा- १, खंडाळा- १, कोकलगाव- १, पंचाळा- १, पार्डी आसरा- ८, पिंपळगाव- ८, सावंगा जहांगीर- १, शेलू बु.- १, शेलगाव- १, तांदळी बु.- १, तोंडगाव- ३, उकळीपेन- १, उमरा कापसे- १, वारा जहांगीर- १, वारला- १.   मालेगाव : शहरातील- ११, बोर्डी- १, ब्राह्मणवाडा- ३, डही- १, डव्हा- १, इराळा- १, जऊळका- १, खडकी- १, खैरखेडा- १, किन्हीराजा- १, मारसूळ- १, पांगरी नवघरे- २, पिंपळशेंडा- १, पिंपळा- १, रेगाव- १, शिरपूर- ७, वाघी- १.   रिसोड : बसस्थानक मागील परिसर- १, शाहू नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ५, आगरवाडी- १, भरजहांगीर- १, चिचांबाभर- १, चिखली- १, डोणगाव- १, गोवर्धन- १, कळमगव्हाण- ४, करंजी- १, केनवड- १, ...

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य

  ·         वाशिम जिल्ह्यात २७,७३६ शिधापत्रिकेतील लाभार्थी पात्र वाशिम ,   दि. २६ (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ दिला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार असून जिल्ह्यातील २७ हजार ७३६ शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांनी प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम (फर्स्ट कम फर्स्ट सर्वड) या तत्वानुसार...