Posts

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची माहिती तातडीने संकलित करा - पीयूष सिंह

Image
·          विभागीय आयुक्तांनी घेतला विविध योजनांचा आढावा ·          वृक्ष लागवड मोहिमेस गती देण्याच्या सूचना वाशिम ,  दि. १२ :  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अद्याप माहिती संकलित करण्यात न आलेले पात्र लाभार्थी तसेच संयुक्त खातेदारांमधील पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलनाची कार्यवाही लवकरात लवरक पूर्ण करावी. तसेच ही माहिती अचूक असेल याची काळजी घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उप वनसंरक्षक सुमंत सोलंकी यांच्यासह प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा उप निबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, धनंजय गोगटे, अनुप खांडे, संदीप भास्के, जिल्हा सूचना व विज्ञान...

कीटकनाशक फवारणी करताना काळजी घ्या

Image
·         शेतकरी, शेतमजूर यांना कृषि विभागाचे आवाहन वाशिम , दि. ०९ : गेल्या काही दिवसांत किटकनाशकांच्या फवारणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणांची माहिती विविध माध्यमांमधून समोर आली आहे. ही प्रकरणे किटकनाशकांच्या वापराशी संबंधीत आहेत अथवा नाही, याची शहनिशा करण्याचे काम कृषि विभागातर्फे सुरु आहे. जिल्हा प्रशासन बाधित शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करीत आहे. कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होवू नये, यासाठी शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली आहे. या रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. बाधित व्यक्तींच्या कुटुंबियांकडून कृषि अधिकाऱ्यांनी किटकनाशकांच्या वापराबद्दल माहिती घेतली आहे. विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या किटकनाशकांचे नमुने घेण्याबाबत संबंधित किटकनाशक निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सध...

वृक्ष लागवड, संवर्धनासाठी पुढाकार घ्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·          दोनद बु., शिवणी येथे वृक्ष लागवड मोहीम ·          सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत उपक्रम वाशिम , दि. ०९ : जलसंधारण आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांची संख्या वाढणे महत्त्वाचे आहे. याकरिता जलसंधारणाच्या इतर कामांसोबत वृक्ष लागवड व संगोपनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज केले. कारंजा तालुक्यातील दोनद बु. व मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. दोनद बु. येथे झालेल्या कार्यक्रमाला कारंजाचे उपविभागीय अधिकारी अनुप खांडे , तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके , गट विकास अधिकारी कालिदास तापी , वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. इढोळे , पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानोटे, तालुका समन्वयक रविंद्र लोखंडे व प्रशांत अवचार उपस्थित होते. तसेच शिवणी येथे झालेल्या कार्यक्रमाला मंगरूळपीर तहसीलदार किशोर बागडे , गट विकास अधिकारी डी. एच. टाकरस , तालुका कृषि अधिकारी सच...

खरीप पिक कर्ज वितरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Image
वाशिम , दि. ०८ : खरीप हंगाम पिक कर्ज वितरणाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात सर्व बँक प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी बँक निहाय पिक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक विजय खंडरे यांच्यासह सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप पिक कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी बँक प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित केली जात आहे. आज झालेल्या बैठकीत कर्ज वितरणास गती देण्यासाठी बँकांमार्फत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी झाल्याने पात्र ठरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पिक कर्जाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. तसेच जे शेतकरी पिक कर्जासाठी पात्र आहेत, मात्र काही कारणांमुळे बँकिंगच्या प्रवाहात आलेले...

एकमेकांच्या धर्मांविषयी आदर बाळगा - मकरंद रानडे

Image
·          वाशिम पोलीस दलाचा ‘ईद मिलन’ उपक्रम ·          सामाजिक सलोखा कायम राखण्याचे सर्वधर्मियांना आवाहन वाशिम ,  दि. ०६ :   सामाजिक सलोखा कायम ठेवायचा असेल तर सर्व धर्मियांनी एकमेकांच्या धर्मांविषयी आदर बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी केले. वाशिम जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शुक्रवारी वाटाणे लॉन येथे आयोजित ‘ईद मिलन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. रानडे म्हणाले, काही वर्षांपूर्वी घडलेल्या अप्रिय घटनांमुळे वाशिम हा ‘संवेदनशील’ जिल्हा समजला जातो. पण सध्या जिल्ह्यातील सामाजिक सलोखा चांगला आहे. आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सव, मोहरम, दुर्गा उत्सव तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम राखण्यासाठी...