सातवी आर्थिक गणना विषयक एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न
वाशिम , दि. १७ : केंद्र शासनाच्या सांख्यिकी विभागामार्फत राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेचे काम हाती घेण्यात आले असून , या गणनेद्वारे देशामध्ये कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने आज नियोजन भवन सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी ज. भा. अढाव , एनएसएसओ अकोलाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी एस. एन. मुळे, आर. पी. लिखार, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी दिव्या शर्मा, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी, संजय यादव, श्रीकांत बोरसे, जिल्हा उद्योग केंद्रांचा श्री. ठाकरे उपस्थित होते. श्री. हिंगे म्हणाले, सातवी आर्थिक गणनेचे काम विहित कालावधीत व अचूकपणे पूर्ण होणे आवश्यक आहे. याकरिता सर्व संबंधितांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वकपणे पार पाडावी. या कार्यशाळेत श्री. मुळे यांनी सातवी आर्थिक गणना विषयी संकल्पना , व्याप्ती , उद्दीष्टे , क्षेत्रिय कामाकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण व शह...