रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा - खासदार भावना गवळी
· रस्ता सुरक्षा समिती बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा · अपघातास कारणीभूत अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना वाशिम , दि . १४ : रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असून हे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष तथा खासदार भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सय्यद समरीन यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. गवळी म्हणाल्या, वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघात...