Posts
Mee Mukhyamantri Boltoy-CM Devendra Fadnavis interacting with students o...
- Get link
- X
- Other Apps
वीज ग्राहकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Get link
- X
- Other Apps
· ऊर्जामंत्र्यांचा वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांशी थेट संवाद · वीज जोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्याचे आवाहन · मानवी अपघाताची प्रलंबित प्रकरणे सात दिवसांत निकाली काढण्याचे आदेश · मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ते बंद करणार वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व वीज ग्राहकांनी जनतेशी थेट संवाद कार्यक्रमात मांडलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, अभियंते यांनी तात्काळ कार्यवाही करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जनतेशी थेट संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक...
ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमणुकीची कार्यवाही गतिमान करा - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Get link
- X
- Other Apps
· जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये होणार नेमणुका · ग्रामीण भागातील विद्युत जोडणी देखभालीची जबाबदारी · प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी घेणार कृषीपंप जोडणीचा आढावा वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील ३ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक आयटीआय वीजतंत्री पात्रताधारक उमेदवाराचे नावाची शिफारस घेऊन ही नेमणूक करावी. याबाबत जिल्हा प्रशासन व महावितरणने विशेष प्रयत्न करून नेमणुकांच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे...
वाशिम जिल्ह्यातील सर्व विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढविणार - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Get link
- X
- Other Apps
· जिल्ह्यातील तीन विद्युत उपकेंद्रांच्या कामांचे भूमिपूजन · डोंगरकिन्ही, कुऱ्हा उपकेंद्राचे कामही लवकरच सुरु होणार · ग्रामपंचायत, नगरपरिषदमध्ये विद्युत व्यवस्थापक नेमणार · बेरोजगार अभियंत्यांना ७५ लाखांपर्यंतची कामे देण्याच्या सूचना वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील अनेक ३३/११ के.व्ही.ची उपकेंद्रे अतिभारीत झाल्यामुळे वीज जोडण्या प्रलंबित आहेत. तसेच पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बेलमंडल (ता. कारंजा), आसेगाव पेन (ता. रिसोड) व कुपटा (ता. मानोरा) येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते....