वाचन संस्कृतीला नवी दिशा देणारा जिल्हा ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम


वाचन संस्कृतीला नवी दिशा देणारा जिल्हा ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम

जिल्हा ग्रंथालयासाठी आवडीची, उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी पुस्तके  सुचवावीत

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 
वाशिम,दि.२४ डिसेंबर (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहाच्या पाठीमागे, सिव्हिल लाईन कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुसज्ज जिल्हा ग्रंथालय आहे.  जिल्हा ग्रंथालयात जवळपास ६०  हजार पुस्तके उपलब्ध आहेत. (https://eg4.nic.in/OPAC/Default.aspx?CL_NAME=DOLMH) या लिंकवर क्लिक केल्यास वाशिम  जिल्हा निवड करून ग्रंथालयात असलेल्या पुस्तकाची यादी बघता येते. 
जिल्ह्यामध्ये वाचन संस्कृतीस चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

वाचन संस्कृतीचा प्रसार, ज्ञानवृद्धी आणि समाजाच्या बौद्धिक विकासासाठी ग्रंथालये ही अत्यंत महत्त्वाची केंद्रे आहेत. बदलत्या काळात वाचकांच्या आवडी-निवडी, अभ्यासाच्या गरजा आणि ज्ञानाच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल लक्षात घेऊन ग्रंथसंपदा  अद्ययावत करता येते. या  उद्देशाने वाचकांकडून त्यांच्या अवाडीच्या पुस्तकांना सुचविण्याचा नविन उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हा ग्रंथालयामध्ये वरील यादिव्यतिरिक्त वाशिम जिल्ह्यातील रसिक वाचकांची आवडीची, उपयुक्त व प्रेरणादायी पुस्तके अजून जास्त संख्येने उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. तरी या गूगल फॉर्मद्वारे जिल्ह्यातील साहित्यप्रेमी नागरिक, विद्यार्थी तसेच सर्व वयोगटातील वाचकांनी त्यांना अपेक्षित असणारी दर्जेदार पुस्तके सुचवावीत, असे आवाहन जिल्हा  प्रशासनाने केले आहे. 

ज्या पुस्तकांसाठी जास्त वाचकांची पसंती असेल आणि शासकीय निकषानुसार शक्य असेल अशी जास्तीत जास्त नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

 ग्रंथालयासाठी पुस्तक प्रस्तावासाठी 
 (https://tinyurl.com/washimlibrary)

 या लिंक वर क्लिक करुन किंवा सोबत दिलेला QR Code   
स्कॅन  करुन  देखील पुस्तकाचे नाव नोंदविता येईल.

हा गुगलफॉर्म ग्रंथालयासाठी वाचकांकडून पुस्तकांच्या सूचना / प्रस्ताव गोळा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

कृपया पुस्तक सुचविताना  पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तकाविषयी चार शब्द ही माहिती अचूक व पूर्णपणे नमूद करावी.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित