Posts

Showing posts from August, 2025

नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देऊ : पालकमंत्र्यांची ग्वाही

Image
नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देऊ पालकमंत्र्यांची ग्वाही  वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.        प्राथमिक अहवालानुसार, वाशिम तालुक्यात ९८ गावे बाधित होऊन ३९,३१० हेक्टर क्षेत्रावर, रिसोड तालुक्यात ८५ गावे बाधित होऊन ४८,६४५ हेक्टर क्षेत्रावर, मालेगाव तालुक्यात १२७ गावे बाधित होऊन ५०,३११ हेक्टर क्षेत्रावर, मंगरूळपीर तालुक्यात ७४ गावे बाधित होऊन १०,४८९ हेक्टर क्षेत्रावर, कारंजा तालुक्यात १ गाव बाधित होऊन ५.९९ हेक्टर क्षेत्रावर तर मानोरा तालुक्यात ६ गावे...

शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी;एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये– पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

Image
शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी;एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश वाशिम,दि.२० (जिमाका) : शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री श्री भरणे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिता महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.  पालकमंत्र्यांनी यावेळी रिसोड तालुक्यातील महागाव, बाळखेड,वाकद ,शेलूखडसे, पिंपरखेड,मसलापेन या ...

कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा जिल्हा दौरा

Image
कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा जिल्हा दौरा वाशिम, दि.१९ ऑगस्ट (जिमाका) : राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे २० ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.  बुधवारी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यात  आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी, सकाळी ११.३० वाजता मालेगाव तालुक्यात आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी, दुपारी  १२.३० वाजता वाशिम तालुक्यात आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी,  दुपारी  १.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, २ वाजता अतिवृष्टी बाबत आढावा बैठक आढावा बैठक व ३ वाजता वाशिम येथुन प्रयाण करतील.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Image
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया         वाशीम, दि. 18 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मदतीतून वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राहणाऱ्या सात वर्षीय देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.     ही महागडी शस्त्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने पार पडल्याचे समाधान मुलीच्या पालकांनी व्यक्त केले.    रवींद्र गावंडे (रा. वरूड बु.) यांच्या मुलीला जानेवारी २०२५ मध्ये तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. मुलीची अकोला आणि त्यानंतर नागपूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. तसेच तिचे यकृत तातडीने प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला.   भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ...

शेतकरी बांधवांनो घाबरू नका, शासन आपल्या पाठीशी आहे – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Image

रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा- पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे> • रिठद येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण> • जिल्ह्यातील 10 केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन;

Image
रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा- पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे > • रिठद येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण > • जिल्ह्यातील 10 केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन;  *वाशिम,दि.१५ ऑगस्ट (जिमाका) :* गावोगावी सक्षम आरोग्य सुविधा पोहोचवणे ही आरोग्य विभागाचे प्रार्थमक्रम आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ उपचारासाठी नसून प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम, जनजागृती आणि वेळेवर निदानासाठीही महत्त्वाची ठरतात. पुढील काळातही आरोग्य सुविधांना बळकटीकरणासाठी गती दिल्या जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले. रिसोड तालुक्यातील रिठद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किरणराव सरनाईक, अमित झनक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, रिठद सरपंच पंचफुला अंभोरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैभव सरनाईक, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे,  तहसीलदार प्र...

वाशिम जिल्ह्यात विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी- पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे> भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात;> शेती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरणात उल्लेखनीय प्रगती

Image
वाशिम जिल्ह्यात विकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी- पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे > भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; > शेती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरणात उल्लेखनीय प्रगती   वाशिम, दि. 15 (जिमाका) –वाशिम जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पायाभूत सुविधा, शेती, महिला सक्षमीकरण, सामाजिक कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. या योजनांमुळे प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.  वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, अपर पोल...

#वाशिम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीवर केलेली विद्युत रोषणाई

Image
#वाशिम  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीवर केलेली विद्युत रोषणाई

> स्वातंत्र्यदिनाच्या पर्वानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध महत्वाच्या स्थळांवर रोषणाई करण्यात येत आहे. वाशिम जिल्हा परिषद इमारत तिरंगा रंगात विद्युत रोषणाईने प्रकाशमान झाली आहे. #हरघर_तिरंगा#वाशिम

Image
> स्वातंत्र्यदिनाच्या पर्वानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम  राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध महत्वाच्या स्थळांवर रोषणाई करण्यात येत आहे. वाशिम जिल्हा परिषद इमारत तिरंगा रंगात विद्युत रोषणाईने प्रकाशमान झाली आहे. #हरघर_तिरंगा #वाशिम

‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबवावे जिल्हा प्रशासनाने आवाहन

Image
‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबवावे       जिल्हा प्रशासनाने आवाहन             वाशिम दि. १४ ऑगस्ट (जिमाका) देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने १५ ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान अधिक उत्साहपूर्ण वातावरणात प्रभावीपणे राबविण्यात यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविला जाणार आहे. राज्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा २ ते ८ ऑगस्ट २०२५, दुसरा टप्पा ९ ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविला गेला. तर तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगामय वातावरण निर्मिती व्हावे, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दृश्य माध्यमांचा वापर करण्यात यावा. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती स...

सॉर्टींग व पॅकेजिंग युनिटचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन> माती लॅबची केली पाहणी> अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला दिली सदिच्छा भेट

Image
सॉर्टींग व पॅकेजिंग युनिटचे  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन > माती लॅबची केली पाहणी > अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला दिली सदिच्छा भेट वाशिम,दि.१४ ऑगस्ट (जिमाका): मानव विकास मिशन तालुका स्पेसिफिक कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), वाशिम यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कलर सॉर्ट्रेक्स, प्रिंटिंग व पॅकेजिंग युनिटचे बाभूळगाव येथे उद्घाटन तसेच मौजे साखरा (ता. वाशिम) येथील डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पंढरीनाथ जैविक शेतकरी उत्पादक कंपनी येथे उभारलेल्या माती लॅब सेंटर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्र) व सामूहिक सुविधा केंद्राचे लोकार्पण  राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.         याप्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री.भरणे म्हणाले, शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रक्रिया उद्योगांची साखळी ग्रामीण भागात निर्माण होणे आवश्यक आहे. सॉर्टींग व पॅकेजि...

पोहरादेवी येथील धार्मिक स्थळांना पालकमंत्र्यांची भेट; तीर्थस्थळ विकास आराखड्याचा ना. दत्तात्रय भरणे यांनी घेतला आढावा

Image
पोहरादेवी येथील धार्मिक स्थळांना पालकमंत्र्यांची भेट; तीर्थस्थळ विकास आराखड्याचा ना. दत्तात्रय भरणे यांनी घेतला आढावा वाशिम, दि. १४ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यातील बंजारा समाजाचे ‘काशी’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध पोहरादेवी तीर्थक्षेत्र पर्यटनदृष्ट्या आकर्षक आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्यासाठी विकास आराखड्याचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीत कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी तीर्थक्षेत्राचा धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपत विकास कामे गतीमान करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला आमदार बाबूसिंग महाराज राठोड, सई डहाके, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उप वनसंरक्षक अभिजित वायकोस, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री ना. भरणे म्हणाले की, श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास योजना तसेच उमरी आणि पोहरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याती...

रानभाजी महोत्सव ,वाशिम शेती शिल्प कृषी विपणन विक्री केंद्राचे उद्घाटन व वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न ;शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे

Image
रानभाजी महोत्सव ,वाशिम शेती शिल्प कृषी विपणन विक्री केंद्राचे उद्घाटन व वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न ; शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी        पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे  वाशिम, दि. १४ ऑगस्ट (जिमाका) शेतकरी हा आपल्या कृषी संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांच्या श्रमामुळेच राज्याची अर्थव्यवस्था बहरते. नाविन्यपूर्ण शेती पद्धती, सेंद्रिय शेती, आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा संगम घडवून अधिक उत्पादनक्षमता साध्य करणे हे आजच्या काळाची गरज आहे. शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात मी कायम त्यांच्या पाठीशी उभा राहीन, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.       वाशिम शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्र काटा रोड येथे १४ ऑगस्ट २०२५ रोजी रानभाजी महोत्सव वाशिम शेती शिल्प कृषी विपणन विक्री केंद्राचे उद्घाटन व वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा या विविध कृषी उपक्रमांचे आयोजन ...

जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक;सर्वसमावेशक व समतोल विकासाला प्राधान्य - पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे

Image
जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक; सर्वसमावेशक व समतोल विकासाला प्राधान्य - पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे वाशिम दि. 14 ऑगस्ट (जिमाका): जिल्हा नियोजन समितीअंतर्गत योजना व उपयोजना मिळून 406 कोटी रुपयांचा निधीचे नियोजन आहे. त्यातून पायाभूत सुविधांची उभारणी करतानाच, सर्व घटकांसाठी विविध सुविधा निर्माण केल्या जातील. समतोल व सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी बैठकीला खासदार संजय देशमुख, आमदार भावना गवळी, किरण सरनाईक, बाबूसिंग महाराज राठोड, वसंत खंडलेवाल, अमित झनक, श्याम खोडे, सई डहाके तसेच जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. पा...

पात्र शेतकऱ्यांनी ‘जन समर्थ’चा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम जिल्हा समन्वय सल्लागार समितीची विशेष बैठक

Image
पात्र शेतकऱ्यांनी ‘जन समर्थ’चा लाभ घ्यावा      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम  जिल्हा समन्वय सल्लागार समितीची विशेष बैठक  वाशिम,दि.१२ ऑगस्ट (जिमाका) शेतकऱ्यांना पिककर्जाची मंजुरी जलद, पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने मिळावी, यासाठी जन समर्थ पोर्टलचा वापर सुरू झाला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. या उपक्रमामुळे बँकांच्या फेर्‍या टाळून घरबसल्या कर्जमंजुरीची सोय होणार आहे. शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि पीएसबी अलायन्स यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाअंतर्गत अॅग्रीस्टॅक डेटा थेट जन समर्थ पोर्टलशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुलभ आणि कागदविरहित होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.     आज १२ ऑगस्ट रोजी जिल्हा समन्वय समितीची विशेष बैठक जिल्हाधिकारी क...

शेतकऱ्यांच्या खात्यात ९२१ कोटींची थेट भरपाई; पंतप्रधान पिक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Image
शेतकऱ्यांच्या खात्यात ९२१ कोटींची थेट भरपाई; पंतप्रधान पिक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती वाशिम, दि .११ ऑगस्ट (जिमाका) पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील रखडलेली नुकसान भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. एकूण ९२१ कोटी रुपये सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषिमंत्री श्री.भरणे म्हणाले, मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. पिक विमा योजनेअंतर्गत दावा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काही तांत्रिक कारणांमुळे ही रक्कम रखडली होती. आता हा अडथळा दूर झाला असून सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा आर्थिक आधार महत्वाचा ठरेल. खरीप हंगामाच्या सुरुवातीला मिळणारी ही रक्कम त्यांना पुन्हा उत्पादन प्रक्रियेत उ...

सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश विकास, सुरक्षा व गतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाची हाक

Image
सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश   विकास, सुरक्षा व गतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाची हाक वाशिम, दि. ८ ऑगस्ट (जिमाका)  जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, अपघात नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हा प्रशासनाचा ठरलेला अजेंडा असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याचे  निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात पार पडलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकास आराखडा, प्रलंबित प्रकल्प आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस  जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण,आरडीसी विश्वनाथ घुगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते. बैठकीत पूरग्रस्त भागातील मदतकार्य, रस्त्यांची युद्धपातळीवरील दुरुस्ती, अपघातप्रवण ठिकाणांचे पुनरावलोकन, वाहतूक व्यवस्थापन, चेतावणी फलक आणि सिग्नल बसविणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्...

जिल्हा प्रशासनाला "मिशन आशीर्वाद" साठी राष्ट्रीय पुरस्कारकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव

Image
जिल्हा प्रशासनाला "मिशन आशीर्वाद" साठी राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव वाशिम, दि. ७ ऑगस्ट (जिमाका) जिल्हा प्रशासनाने सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत "मिशन आशीर्वाद" या उपक्रमासाठी "सेंद्रिय शेती उत्कृष्टता पुरस्कार" हा मानाचा राष्ट्रीय सन्मान प्राप्त केला आहे. हा पुरस्कार दुसरी शाश्वत शेती परिषद आणि पुरस्कार २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या "मिशन आशीर्वाद" या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्याच्या सेंद्रिय शेती क्षेत्रातील कामगिरीला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या यशामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह आणि प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे यांचा मोलाचा सहभाग आहे. शाश्वतता महत्त्वाची आहे, इंडीअ‍ॅग्री, आण...

मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

Image
मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घ्या  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.  वाशिम,दि.५ ऑगस्ट(जिमाका) मृत्यूनंतरही जीवदान देता येते, जीवन जगता जगवता येते" या संकल्पनेला बळ देत जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी  जिल्ह्यातील नागरिकांना मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान अवयवदान सप्ताह साजरा केला जात असून, याअंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालये, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, आपण मृत्यूनंतर उपयोगी न पडणारे अवयव दान करून अनेक जिवांना जीवनदान देऊ शकतो. डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, त्वचा इत्यादी अवयव मरणोत्तर दान करता येतात. हे दान मानवतेची खरी सेवा आहे." नोंदणीसाठी राष्ट्रीय अवयव व ऊती स्थानांतरण संस्थेद्वारे अधिकृत वेबसाईटवर सुविधा उपलब्ध असून, इच्छुक व्यक्तींनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी: 🔗 https://notto.abdm....

महसूल प्रशासन हे जनतेच्या दारात न्याय आणणारे व्यवस्थापन आहे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकरवाशिम तहसील कार्यालयात विविध योजनांचे आदेश व दाखल्यांचे लाभार्थ्यांना वितरण

Image
महसूल प्रशासन हे जनतेच्या दारात न्याय आणणारे व्यवस्थापन आहे      उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर वाशिम तहसील कार्यालयात विविध योजनांचे आदेश व दाखल्यांचे लाभार्थ्यांना वितरण वाशिम, दि. ३ ऑगस्ट (जिमाका)  महसूल विभाग हा शासनाच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा कणा आहे. सामान्य जनतेच्या संपर्कात सर्वाधिक वेळ येणाऱ्या या विभागाची जबाबदारी मोठी असून त्यातून जनतेचा शासनावरचा विश्वास दृढ होतो.      महसूल सप्ताह निमित्ताने आपण विविध योजनांचे आदेश, दाखले, सनद आणि मंजुरी पत्रकांचे वाटप करत आहोत. हे वाटप ही केवळ कागदांची देवाणघेवाण नसून, ही लोककल्याणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत, हेच याचे प्रतिबिंब आहे.असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी  वैशाली देवकर यांनी केले. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहाअंतर्गत २ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय, वाशिम येथील नवीन सभागृहामध्ये पात्र लाभार्थ्यांना योजना निहाय आदेश व कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या ब...

महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सेवा तुमच्या दारी!वाशिम तालुक्यात ८ ठिकाणी शिबिरांचे आयोजन, नागरिकांना मिळाले विविध प्रमाणपत्रे व लाभ

Image
महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सेवा तुमच्या दारी! वाशिम तालुक्यात ८ ठिकाणी शिबिरांचे आयोजन, नागरिकांना मिळाले विविध प्रमाणपत्रे व लाभ वाशिम, दि. ४ ऑगस्ट (जिमाका): दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभर साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताहाच्या चौथ्या दिवशी वाशिम तालुक्यातील विविध मंडळांमध्ये "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान" अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने विविध शासकीय सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्यात आल्या. आज दि. ४ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, पार्डी आसरा, पार्डी टकमोर, नागठाणा, कोंडाळा झामरे, वारला, राजगाव या आठ मंडळांमधील उकळीपेन व केकतउमरा येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, नॉन क्रिमीलेयर, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, ईडब्लूएस प्रमाणपत्र, आधार कार्ड, सातबारा, आयुष्यमान गोल्डन कार्ड, जॉब कार्ड, शिधापत्रिका, अग्रीस्टक प्रमाणपत्र, जलतारा योजना यांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान योजना यांसारख्या सामाजिक योजनांचे लाभ देण्यात आले. कार्यक्रमात निलेश पळसकर (तहसीलदार वाशि...

वाशिम शेती शिल्प’चे चिया बियाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नवा आत्मविश्‍वास

Image
‘वाशिम शेती शिल्प’चे चिया बियाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट   जिल्हाधिकारी बुवनेश्वरी  यांचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नवा आत्मविश्‍वास वाशिम, दि. ३ ऑगस्ट (जिमाका)   जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे प्रतीक ठरलेल्या ‘वाशिम शेती शिल्प’ या स्थानिक कृषी ब्रँडखाली उत्पादित चिया बियाण्यांचे नमुने आज  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना भेट स्वरूपात सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.  यांनी हा उपक्रम हाती घेत शेतकऱ्यांच्या उत्पादने राज्यस्तरावर पोहोचवण्याची दिशा दाखवली आहे.  जिल्हा कृषीप्रधान असून, इथल्या शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनामध्ये आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शेतमालाला एक विशिष्ट ओळख देण्यासाठी ‘वाशिम शेती शिल्प’ हा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. या अंतर्गत उत्पादित होणारी चिया बियाणे ही एक पोषणमूल्यांनी समृद्ध आणि बाजारात मागणी असलेली नगदी पीक मानली जाते. या भेटीद्वारे ना केवळ वाशिमच्या कृषी उत्पादनांना मान्यता मिळाली, तर शेतकऱ्यांच्या परिश्रमालाही शासनपा...