पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण





वाशिम, दि. ०१ : महाराष्ट्र दिनानिनिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘शांतीदूत’ या माहितीपुस्तिकेचे विमोचनही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.
धानोरा येथील धानोरकर आदर्श विद्यालयाच्या प्राचार्य रजनी नानासाहेब धानोरक यांना राष्ट्रीय सिल्व्हर स्टार, मंगरूळपीर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक दीपक राजाराम राऊत व कारंजा येथील जे. सी. चवरे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उदय कमलाकर नांदगावकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री ना. राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल रुंदन सुपसिंग राठोड यांना जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार, अनिल गणपती देशमुख यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार व संजय दाजीबाराव शिंदे यांना गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारंजा उपविभागातील तलाठी एन. व्ही. गुगळे, स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार आत्माराम सवाईराम राठोड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हवालदार भगवान गणपत गावंडे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संतोष भानुदास घायाळ (मोप), उमेश केशव वाझुळकर (शेलगाव बोंदाडे), रामकृष्ण नारायण सानप (लोणी बु.), शिवाजी तान्हाजी कांबळे (कळंबेश्वर), संतोष दिगंबर कायंदे (मांडवा) यांनाही यावेळी कृषी समृद्धी शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
स्मार्ट ग्राम योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हिवरा रोहिला (ता. वाशिम), देगाव (ता. रिसोड), दुधाळा (ता. मालेगाव), अजनी (ता. मानोरा), पारवा (ता. मंगरूळपीर), धोत्रा जहांगीर (ता. कारंजा) यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त अंचळ (ता. रिसोड), द्वितीय क्रमांक प्राप्त धोत्रा जहांगीर (ता. कारंजा), तृतीय क्रमांक प्राप्त दुधाळा (ता. मालेगाव) व विशेष पुरकर प्राप्त सायखेडा (ता. मंगरूळपीर), खरोळा (ता. वाशिम) व काजळेश्वर (ता. कारंजा) ग्रामपंचायतींचा सन्मानही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे