Posts

पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा !

Image
🌾 पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळावा, यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचाही यामध्ये समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना रुपये २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेचा लाभ उपलब्ध आहे. तसेच विहित अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारांपर्यंत प्र...

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना!

Image
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR #GovernmentScheme #FarmerWelfare #Maharashtra

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ◾️AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी अनिवार्य आहे. ◾️प्रथम AgriStack वर नोंदणी करा. ◾️त्यानंतर आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करा. ◾️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर DBT द्वारे लाभाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल.

राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश

Image
▪️राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश ▪️मंत्रालयातून जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसीव्दारे बैठकीत  कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत सूचना ▪️१७ लाख शेतकऱ्यांच्या यादीनंतर दुसरी यादी पंधरा दिवसात मुंबई, दि. २९  महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये, असे सक्त निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हेदेखील उपस्थित होते.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६'

Image
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे जाहीर झालेल्या यादीत नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आतापर्यंत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ७.०३ लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे, तर ९.९३ लाख शेतकरी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांचे असून, एकूण ₹१३,३३६ कोटींच्या कर्जमुक्तीचा समावेश आहे.