Posts

प्रत्येक शेतकरी' उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे प्रकल्प संचालक अनिसा महाबळे फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न

Image
'प्रत्येक शेतकरी' उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे      प्रकल्प संचालक अनिसा महाबळे फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न वाशिम,दि.२१ जून (जिमाका) प्रत्येक शेतकरी खातेदार हा शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. यासाठी कृषी विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले. बहुपीक पद्धतीचा अवलंब करून व जलपातळी वाढीच्या उपायोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन एकत्रित कामे केल्यास लवकरच सिंचन क्षेत्रामध्ये भरीव वाढ होईल तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) सन २०२४-२५ अंतर्गत किड व रोग सर्वेक्षण चमुचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानावरून श्रीमती महाबळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शाह,कृषी विज्ञा...

आपत्ती निवारण्याची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य तहसीलदार निलेश पळसकरतहसील कार्यालय वाशिम येथे आपत्ती व्यवस्थापनाचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

Image
आपत्ती निवारण्याची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य         तहसीलदार निलेश पळसकर तहसील कार्यालय वाशिम येथे आपत्ती व्यवस्थापनाचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न वाशिम,दि.२१ जून (जिमाका) सातत्यपूर्ण व एकात्मिक नियोजन प्रक्रिया, व्यवस्थित रचना, सहकार्य आणि आपत्तींच्या संभाव्य धोक्याला प्रतिबंध, आपत्तीतील धोक्यांची तीव्रता कमी करणे, क्षमता सबलीकरण, पूर्वतयारी, तत्पर प्रतिसाद, आपत्ती परिणामांची तीव्रता, व्यापकता पडताळून पाहणे, स्थलांतर, मदत व बचाव कार्य, पुनर्वसन व पुनर्रचना इत्यादी आवश्यक आणि उपयुक्त उपायाची अंमलबजावणी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती निवारण्याची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे प्रतिपादन तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी तहसील कार्यालय वाशिम येथे पूर, विज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश विषयी आपत्ती व्यवस्थापनाचे एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित  करण्यात ...

योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे” मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ उत्साहात साजरा

Image
"योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे”       मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे  जिल्हा प्रशासनाच्या वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ उत्साहात साजरा वाशिम,दि.२१ जून (जिमाका) “योग हे शरीर, मन व आत्मा यांना जोडण्याचे एक साधन आहे”. योगातुन सुदृढ व निरोगी जीवन जगता येते. केवळ २१ जुन रोजी योगा न करता सर्वांनी दररोज योगा करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले. २१ जून रोजी आयुष मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा शल्यचिकीत्सक, विविध योग संघटना, जिल्हा परिषद,सर्व शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा पुरस्कारार्थी, खेळाडु व मार्गदर्शक, स्कॉऊट गाईड ,एन.एस.एस.,एन.सी.सी. इत्यादी प्रशासकीय विभाग व जिल्ह्यातील योगसाधक यांच्या उस्फुर्त प्रतिसादाने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात वाटाने लॉन येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.वाघमारे बोलत होते. कार्यक्रमास योगगुरू रामभाऊ ...

आंतरराष्ट्रीय योग दिन : पूर्व प्रशिक्षण उत्साहात

Image
आंतरराष्ट्रीय योग दिन :  पूर्व प्रशिक्षण उत्साहात वाशिम,दि.१९ जून (जिमाका) जिल्ह्यात १० वा  आंतरराष्ट्रीय योग दिन  २१ जुन २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाचा कार्यक्रम हा वाशिम जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वाटाणे लॉन येथे  आयोजित करण्यात आला  आहे.  जिल्हयातील विविध योग समिती, योग प्रशिक्षक, आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी, यांच्या वतीने सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन व लाभणार आहे.  योग दिनाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी शासकीय विविध विभागातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी, पोलीस विभाग,जिल्हा परिषद,सर्व शैक्षणिक संस्था,क्रीडा क्षेत्रातील मान्यवर,क्रीडा पुरस्कारार्थी,खेळाडु व मार्गदर्शक , स्कॉऊट गाईड , एन.एस.एस.,एन.सी.सी., योग संघटना इत्यादी विभागाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तसेच वाशिम जिल्यातील जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरीष्ठ महाविद्यालय, ग्राम पंचायतच्या वतीने गावातील सर्व नागरीक यांनी कमीत कमी ५० च्या गटामध्ये एकत्र येऊन  २१ जुन २०२४ रोजी...

आदिवासी मुला- मुलींचे शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी३० जुनपर्यंत अर्ज मागविले

Image
आदिवासी मुला- मुलींचे शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी ३० जुनपर्यंत अर्ज मागविले         वाशिम, दि. १९ जुन (जिमाका) :  आदिवासी मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.वसतीगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.इयत्ता ११ वी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे.           ऑनलाईन अर्ज www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह ३० जून २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.            जिल्हयात आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्रमांक १, चिखली रोड,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाजुला वाशिम. आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्रमांक १, चिखली रोड,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाजुला वाशिम. आदिवासी मुलांचे वसतीगृह क्रमांक २, माउली कॉम्प्लेक्स, महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ वाशिम. आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्रमांक २, द्वारा...